माझ्या नवऱ्याची बायकोमधील सौमित्रची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री

माझ्या नवऱ्याची बायकोमधील सौमित्रची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री

मालिकेतील सर्वांचा लाडका मित्र, तो आला की तिथल्या वातावरणात चैतन्य येतं, जीव लावणारा, मजा मस्ती करणारा व वेळ जर आली तर समोरच्याला चांगलाच धडा शिकवणारा माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतला सौमित्र म्हणजे अभिनेता अद्वैत दादरकर.

अद्वैत सौमित्रच्या या हटके पात्रामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. या मालिकेमध्ये आत्ता नुकतेच राधिका व सौमित्र या दोघांचे लग्न झाले आहे आहे.

त्याच्या खऱ्या लाईफमध्ये लग्न झालेले असून त्याची पत्नी देखील एक अभिनेत्री आहे आणि तिने सुद्धा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकलेले आहे. अद्वैतचे मराठी नाटकांमध्ये मोठे योगदान आहे.

मराठी रंगभूमीवर अगदीच त्याच्याप्रमाणेच त्याची पत्नी देखील खूप प्रसिद्ध आहे. अद्वैत दादरकरच्या पत्नीचे नाव भक्ती देसाई आहे. आणि तिच्या तू म्हणशील तसं या नाटकाला सध्या प्रेक्षकवर्ग चांगलाच प्रतिसाद देत आहेत.

ह्या नाटकांचे दिग्दर्शन प्रसाद ओकने केले असून या नाटकाची निर्मिती प्रशांत दामले यांनी केली आहे. तसेच या नाटकात तिच्यासोबत संकर्षण कऱ्हाडे महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या नाटकातील भक्तीच्या अभिनयाचे सध्या चांगलेच कौतुक होत आहे.

भक्तीने नाटकांप्रमाणेच मराठी मालिकेत देखील अभिनय केलेला आहे. झी मराठीवरील अरुंधती या प्रसिद्ध मालिकेत ती मुख्य भूमिकेत दिसली होती.अद्वैत व भक्ती यांना एक मुलगी असून त्या दोघांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर आपल्याला तिचे फोटो पाहायला मिळतात. मुलीचे नाव मीरा असून ती दिसायला खूपच गोंडस आणि सुंदर आहे.

अद्वैत आणि भक्ती या दोघांची ओळख कॉलेजलाईफ पासूनच आहे. कॉलेज मध्ये असताना तो नाटकाचे दिग्दर्शन करायचा तर भक्ती नाटकात काम करायची. नाटकांमुळेच त्या दोघांचा परिचय झाला. काहीच महिन्यात त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि काही वर्षांनी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Team Hou De Viral