‘माझ्या नव-याची बायको’ मध्ये दिसणाऱ्या रेवतीचा पती आहे ‘छत्रपती संभाजी’ मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता !

‘माझ्या नव-याची बायको’ मध्ये दिसणाऱ्या रेवतीचा पती आहे ‘छत्रपती संभाजी’ मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता !

झी मराठी दिसणारी ‘माझ्या नव-याची बायको’ मालिका ही छोट्या पडद्यावरची हिट मालिका आहे. या मालिकेत दिसणाऱ्या एक आणि एक व्यक्तीरेखा रसिकांच्या मनाला भावलेल्या आहेत. या मालिकेमध्ये राधिका जेव्हा जेव्हा अडचणीत सापडते तेव्हा तेव्हा मदत करायला उभी असणारी तिची मैत्रीण म्हणजे रेवती.

राधिकाचा पहिला नवरा म्हणजे गुरुनाथच्या विरोधात असणाऱ्या लढाईत राधिकाला रेवती उत्तमरीत्या मदत करते. या मालिकेमध्ये रेवतीला पुरुष, पुरुषी वृत्तीबाबत प्रचंड रागराग करतांना दाखवण्यात आले आहे. आणि ही भूमिका उत्तम रित्या साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव श्वेता मेहंदळे असे आहे. 

श्वेता मेहंदळे ही छत्रपती संभाजी मालिकेचे दिसणाऱ्या कवी कलश अर्थात अभिनेता राहुल मेहंदळे यांची पत्नी आहे. ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेमध्ये राहुल आणि श्वेता एकत्र दिसले होते. या मालिकेमध्ये काम करत असतानाच दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रुपांतर हे प्रेमात झाले. यानंतर श्वेता आणि राहुल यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला.

राहुल व श्वेता यांना आर्य नावाचा मुलगाही आहे. माझ्या नव-याची बायको या मालिकेत गंभीर आणि पुरुषांचा तिरस्कार करणा-या महिलेची भूमिका श्वेता साकारत असली तरी रिअल लाइफमध्ये ती मनमौजी आणि धम्माल मस्ती करणारी आहे.

पती राहुल, मुलासह श्वेता धम्माल करत असते. नातेवाईक आणि मित्रां सोबत ती फुल्ल ऑन एन्जॉय करते. ‘माझ्या नव-याची बायको’ या मालिकेआधी विविध मालिका आणि सिनेमांमध्ये श्वेतानं उत्तम असा अभिनय केला आहे.

‘नायक’, ‘या गोजिरवाण्या घरात’, ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ या मालिकांमध्ये श्वेतानं भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय ‘धूम 2 धमाल’, ‘पाच नार एक बेजार’, ‘सगळं करुन भागलं’, ‘असा मी तसा मी’, ‘जावईबापू जिंदाबाद’ अशा सिनेमांमध्येही श्वेताने आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. 

Team Hou De Viral