मित्रांनो जेवणानंतर ‘या’ ७ गोष्टी चुकूनही करू नका, नाहीतर भोगावे लागतील वाईट परिणाम !

मित्रांनो जेवणानंतर ‘या’ ७ गोष्टी चुकूनही करू नका, नाहीतर भोगावे लागतील वाईट परिणाम !

शरीर निरोगी ठेवण्यासाठी काळजी घेणे खूप महत्वाचे असते. आरोग्यासाठी आपण काळजी घेतो, मात्र, जेवण केल्यानंतर कोणकोणती कामे करू नयेत याकडे लक्ष देत नाही. जेवण झाल्यानंतर आपण लगेच कोणती कामे करतो याचे एकदा निरिक्षण करावे.

काही जण चुकीच्या कृती जेवणानंतर ताबडतोब करतात, याचे दुष्परिणाम त्यांना भविष्यात भोगावे लागू शकतात. तसेच पौष्टीक आहार घेतला तरी जेवताना तो योग्य पध्दतीने खाल्ला न गेल्यास तो न खाल्ल्यासारखाच आहे. शरीर सुदृढ हवे असल्यास काही वाईट गोष्टी कायमच्या सोडणे गरजेचे आहे.

लगेच फळे खाऊ नका – जेवणानंतर लगेच फळांचे सेवन केल्यास खाल्लेले अन्न अन्ननलिकेत अडकुन बसू शकते. यामुळे अन्न व्यवस्थित आत पोहचत नाही. यामुळे तब्येत खराब होऊ शकते. जेवणाच्या एक तास आधी अथवा जेवनानंतर एका तासाने फळे खावीत. रिकाम्यापोटी फळांचे सेवन केल्यास योग्य ऊर्जा शरीरास मिळते.

वॉक करू नये – शरीरासाठी चालणे लाभदायक आहे. परंतु, जेवणानंतर लगेचच चालल्याने पचनक्रियेत अडथळा निर्माण होतो. जेवण झाल्यानंतर सुमारे अर्ध्या तासाने चालणे शरीरास फायदेशीर आहे. जेवल्यानंतर २०-३० मिनिटे चालल्यास पोटाच्या तक्रारी दूर होतात.

चहा पिणे टाळा – जेवणानंतर चहा घ्यायचा असल्यास साधारण एका तासानंतर घेतल्यास शरिरासाठी योग्य ठरू शकतो. प्रमाणाच्या बाहेर चहाचे सेवन शरिरासाठी हानिकारक ठरू शकते. चहाच्या पानामध्ये अ‍ॅसिड असतात. म्हणून जेवणानंतर लगेच चहाचे सेवन करणे टाळावे. या अ‍ॅसिडमुळे अन्नात असलेल्या प्रोटिनला धोका निर्माण होतो. खाल्लेले अन्न पचवण्यासाठी त्रास होऊ शकतो.

बेल्ट सैल करू नये – जेवणावर ताव मारण्यासाठी काही जण जेवणाआधी पॅन्टचा बेल्ट सैल करतात. बेल्ट लूज केल्यास जेवण भरपूर प्रमाणात जाईल, असा यामागील उद्देश असतो. पण असे जेवणाच्याआधी करणे तब्येतीसाठी धोक्याचे ठरू शकते. असे केल्याने शरीरातील आतडे ब्लॉक होवून प्रमाणाच्या बाहेर अन्नाचे सेवन केले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे जेवणाआधी बेल्ट लूज करू नये. भुक असेल तेवढेच खावे.

स्नान करू नये – जेवणानंतर लगेचच स्नान केल्याने हात आणि पाय यामधील रक्त पुरवठा जलद गतीने सुरू होतो. यामुळे पोटात हव्या असलेल्या रक्ताचा पुरवठा कमी होऊन पचन क्रियेवर ताण पडून ती कमजोर होण्याचा धोका असतो.

धु म्रपान – सिगारेट पिणे शरिरासाठी धोक्याचे आहे. जेवणानंतर लगेचच सिगारेट पिण्याची सवय आणखी घातक आहे. जेवनानंतर लगेच सिगरेट पिल्याने अन्नपचन व्यवस्थित होत नाही. जेवणानंतर सिगरेट अथवा तंबाखू खाण्याने गॅसेस आणि अ‍ॅसिडिटीचा त्रास होण्याची शक्यता असते.

टीप– या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral