मिसेस मुख्यमंत्री मधली सुमी खऱ्या आयुष्यात सुद्धा आहे बिनधास्त व ग्लॅमरस, पाहा तिचे फोटो

मिसेस मुख्यमंत्री मधली सुमी खऱ्या आयुष्यात सुद्धा आहे बिनधास्त व ग्लॅमरस, पाहा तिचे फोटो

झी मराठी प्रदर्शित होणारी मालिका मिसेस मुख्यमंत्री ही मालिका कमी वेळातच प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस उतरली आहे. आणि या मालिकेत सुमीचं पात्र हे लोकांना आवडीस उतरलेलं आहे कारण हे पात्र जणू त्यांच्यापैकीच एक आहे का असं वाटतं.

मालिकेत सुमीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अमृता धोंगडे हिने मिसेस मुख्यमंत्री या झी मराठी वरील मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आणि अगदी कमी वेळातच तिने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. सुमी या व्यक्तिरेखेमुळे अमृता महाराष्ट्रातील घराघरात व प्रेक्षकांच्या मनामनात पोहोचली.

मालिकेत सुमीची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजेच अमृता खऱ्या आयुष्यात देखील तितकीच खट्याळ आणि मनमोकळ्या स्वभावाची आहे आणि ऑफस्क्रीनसुद्धा ती तितकीच सेटवर धमाल करते. अमृता तिच्या स्टाइलस्टेटमेंटने सुद्धा प्रेक्षक आणि चाहत्यांना इम्प्रेस करतेय.

तिने तिच्या सोशल मीडियावर ती अनेक कॅज्युअल आऊटफिटमध्ये फोटोज पोस्ट करत असते. कॅज्युअल आऊटफिट, शूज आणि कमीत कमी मेकअपमध्येसुद्धा अमृताचं सौंदर्य तितकंच खुलून येतं.

ऑनस्क्रीन दिसणारी सुमी आणि ऑफस्क्रीन कॅज्युअल अवतारमध्ये दिसणारी अमृता या दोघीनींही प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. सुमीच्या या कॅज्युअल अवतारवर देखील चाहते फिदा झाले आहेत.

Team Hou De Viral