मुन्नाभाई एमबीबीएस मधला कलाकार राहतोय हिमालयातील गुफेत, एका सीनमुळे झाला होता प्रसिद्ध

मुन्नाभाई एमबीबीएस मधला कलाकार राहतोय हिमालयातील गुफेत, एका सीनमुळे झाला होता प्रसिद्ध

बॉलिवूडमध्ये जो काम करतो त्या कलाकारांचं जगणं, जीवनशैली ही एक काय वेगळीच असते. अर्थात आलिशान असते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. परंतु काही वेळा या गोष्टीला काही अभिनेते अपवाद असतात. त्यांची जीवनशैली ही खूपच सामान्य आणि साधी असते.

मनमौजी, आपल्याच धुंदीत आणि आपल्या अटी शर्तींवर जीवन जगणारे कलाकारही या चित्रपटसृष्टीत आहेत. आणि त्यातले एक म्हणजेच मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटामध्ये ‘जादू की झप्पी’ या सीनमुळे प्रचंड प्रसिद्ध झालेले सफाई कर्मचारी, ज्यांना सर्वात पहिल्यांदा संजय दत्त जादूची झप्पी ही देतो.आणि या कलाकाराचे नाव आहे सुरेंद्र राजन.

माघील गेल्या ४ वर्षांपासून सुरेंद्र राजन आपले स्वतःचं घरदार सर्वकाही सोडून हिमालयात राहत आहेत. उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमधील खुन्न गावामध्ये ते साध्य राहत आहेत. दगडापासून तयार झालेल्या घराला त्यांनी आपला आसरा हा बनवला आहे. हे घर राजन यांनी एका निवृत्त भारतीय जवानाकडून घेतलं आहे. हा जवान या घरामध्ये चहाचे छोटेसे दुकान चालवत असे.

१७ किमी डोंगरावरून खाली उतरत या ठिकाणाहून गावात जाता येतं. त्यामुळे ३-४ महिन्यांमधून एकदा खाली उतरत तेल, साबण आणि इतर जीवनावश्यक वस्तू घेऊन जातात.

पिण्याच्या पाण्याची व्यवस्था डोंगरातून फुटलेल्या झऱ्यांमधून होते. ७० पेक्षा जास्त चित्रपटामध्ये काम करणारे सुरेंद्र राजन यांची चित्रकार व फोटोग्राफर अशी सुद्धा ओळख आहे. त्यांना भटकंती व भ्रमंतीची आवड आहे. देशातील कानाकोपऱ्यासह हंगेरी, ऑस्ट्रियाची सफर त्यांनी केली आहे. फिरण्याच्या या आवडीमुळे १६ वर्षे राजन यांनी भाड्याचे घरही घेतलं नव्हतं. कारमध्ये बसूनच त्यांनी देशभर भ्रमंती केली.

लोकांना आपलं असं जगणं विचित्र वाटतं, मात्र पैशांच्या मागे आपण कधीही धावलो नाही असं ते सांगतात. करिअर वगैरे अशा कल्पनांवर विश्वास नसल्याचंही ते सांगतात. निसर्गाच्या सान्निध्यात साहसी धाडसी जगणं, भटकंती करणं यातून आपल्याला आनंद मिळतो हे सांगायलाही ते विसरत नाहीत.

Team Hou De Viral