‘मेकअप’ व ‘ब्युटी’ प्रॉडक्टमध्ये असतात ‘हे’ 6 हानिकारक केमिकल्स, जाणून घ्या त्याबद्दल

‘मेकअप’ व ‘ब्युटी’ प्रॉडक्टमध्ये असतात ‘हे’ 6 हानिकारक केमिकल्स, जाणून घ्या त्याबद्दल

सध्याच्या या युगामध्ये कोणत्याही समारंभात अथवा दैनंदिन जीवनात मेकअप प्रॉडक्ट ही मोठ्या प्रमाणात वापरली जातात. आणि हे मेकअप प्रॉडक्ट वापरणे आता एक सर्वसामान्य गोष्ट झालेली आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का आपण सुंदर दिसण्यासाठी वापरणाऱ्या या मेकअप प्रॉडक्टमध्ये अनेक प्रकारचे घातक घटक देखील असतात.

आपण हे मेकअप प्रॉडक्ट तोंडावर लावतो आपल्या हे घातक घटक आपल्या स्किनद्वारे आपल्या शरीरात प्रवेश करतात ज्यामुळे आपल्याला बरेच आजार होऊ शकतात. याच बद्दल आपण जाणून घेणार आहोत.

१) थलैटचा वापर – कंस्ट्रक्शन मटेरियल आणि पेस्टिसाईड यांचे उत्पादन करण्यासाठी थलैटचा वापर केला जातो. आणि हेच ब्युटी आणि हेल्थकअर इंडस्ट्रीत मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. याचा वापर नेल पॉलिशची शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी आणि हेअर स्प्रेमध्ये केला जातो. यामुळे अस्थमा, डायबिटीज आणि मेटाबोलिक आजारांचा धोका वाढतो.

२) क्लोसनचा वापर – साधारणपणे साबण, टूथ पेस्ट, व इतर काही ब्युटी प्रॉडक्टमध्ये हे केमिकल आढळून येतं. हे केमिकल आपल्या एंडोक्राईनसाठी हानिकारक आहे. यातील दुसरा हानिकारक घटक आहे लिपोफेलिक. म्हणून हे साबण वापरण्याऐवजी हँडमेड साबण वापरणं कधीही चांगलेच.

३) ऑक्सिबेन्जोन – सनस्क्रीनमध्ये या हानिकारक केमिकलचा वापर केला जातो. फूलांमध्ये हा घटक नैसर्गिकरित्या असतो. हे केमिकल कोरल रीफसाठी धोकादायक आहे.

४) सोडियम लॉरेथ सल्फेट – आपण आपल्या त्वचेवर जे काही लावत असतो त्यापैकी 60 टक्क्यांपर्यंत अ‍ॅबसॉर्ब हे केलं जातं. हे केमिकल आपल्या ब्लडलाईनमध्येही जातात. याचा वापर टूथपेस्ट, शॅम्पू, चेहऱ्याची क्रिम बनवण्यासाठी केला जातो. यामुळे स्कीनवर जळजळ होऊ शकते.

५) पॅराबेन्स – कॉस्मेटीक्स आणि मेकअप आयटममध्ये सर्वाधिक वापरला जाणारा घटक आहे. याचा वापर प्रॉडक्टची शेल्फ लाईप वाढवण्यासाठी केला जातो. हा घटक डीएनएसाठी घातक आहे.

६) लेड – याचा वापर थेट लिपस्टिकमध्ये केला जात नाही. लाल, ऑरेंज, ब्राऊन लिपस्टिक बनवण्यासाठी सिंथेटीक आयरन ऑक्साई़डचा वापर केला जातो. यामुळे शरीरात वारंवार मेटल जातं. यामुळे लेड पॉईजनिंग होण्याचा धोका असतो.

Team Hou De Viral