मेथीची भाजी खाणे ठरते अत्यंत फायदेशीर, होतात हे खास आरोग्य लाभ

मेथीची भाजी खाणे ठरते अत्यंत फायदेशीर, होतात हे खास आरोग्य लाभ

आपल्या घरात आपण मेथीपासून तयार केलेले वेगवेगळे पदार्थ खात असतो. आणि हे वेगवेगळे पदार्थ आपल्या आरोग्यासाठी एकदम हेल्दी असतात. आपले शरीर जर उत्तमरित्या चांगले ठेवायचे असेल तर आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचे सेवन असावे. आणि त्यामध्ये तर मेथी ही भाजी आपल्या आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे.

मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध असणाऱ्या मेथीचे आपण नियमित सेवन करायला हव. थंडीच्या या ऋतूत मेथीची भाजी खाणे अत्यंत फायदेशीर असते. कारण मेथीचा गुणधर्म हा मुळात गरम आहे त्यामुळे या भाजीच्या सेवनाने अनेक फायदे होतात.

जाणून घेऊया नेमके फायदे कोणते

त्वचेच्या समस्या दूर हाेतात : मेथीच्या फेसपॅकमुळे चेहऱ्यावर असणारे ब्लॅकहेड्स, पिम्पल्स, सुरकुत्या या कमी होण्यास मदत होते. मेथीचे दाणे पाण्यात उकळून ते पाणी चेहरा धुण्यासाठी वापरा. तसेच ताज्या मेथीच्या पानांची पेस्ट लावल्यानेही अनेक समस्या दूर होतात.

पचनक्रिया चांगली राहते : मेथीची भाजी आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर फेकण्याचे काम करते. जेव्हा जेव्हा अपचनाचा किव्हा पोटदुखीचा त्रास होत असेल तेव्हा मेथीचा चहा घ्यावा. सकाळी उठल्यावर मेथीच्या काढ्याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता दूर होते.

केसांच्या बाबतीत समस्या दूर करते : मेथीची पेस्ट ही जर आपण केसांना लावली किंवा मेथीचा आहारात समावेश केल्यास केस काळे व चमकदार व्हायला सुरुवात होते. केस गळतीवर खोबरेल तेलामध्ये मेथीचे दाणे रात्रभर भिजत ठेवा. नंतर केसांना हलक्या हाताने मसाज करा. मेथीमुळे केसातील कोंडा दूर होतो.

ब्लड प्रेशर राहते नियंत्रणात : मेथीच्या हिरव्या भाजीमध्ये कांदा परतून खाल्याने ब्लडप्रेशरची समस्या दूर होते. ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.

हृदयाचे आरोग्य : मेथीमधील गॅलॉक्टोमेनिन घटकामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. हृदयाचे ठोके व रक्तदाब नियंत्रित राहतो.

डायबिटिजचा त्रास कमी होतो : ज्या व्यक्तींना डायबिटिजचा त्रास आहे. अशा व्यक्तींसाठी मेथीचे दाणे आणि मेथीची भाजी दोन्ही फायदेशीर ठरतात.

लठ्ठपणा कमी करण्यास मदत : दररोजच्या आहारात मेथीच्या भाजीचा किंवा दाण्यांचा समावेश केल्याने वजन नियंत्रणात राहण्यास फायदा होतो.

कोलेस्ट्रॉल कमी होतो : मेथीचे सेवन केल्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral