…म्हणून अमिताभ यांचा ‘सूर्यवंशम’ हा टीव्हीवर पुन्हा पुन्हा दाखवला जातो !

…म्हणून अमिताभ यांचा ‘सूर्यवंशम’ हा टीव्हीवर पुन्हा पुन्हा दाखवला जातो !

‘कौन बनेगा करोडपती’ सीझन 11 संपल्यानंतर अमिताभ बच्चन हे आता चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.

आजकाल अमिताभ बच्चन हे ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी हिमाचल प्रदेश मनाली येथे आहेत. नुकतेच सेटवरचे अमिताभचे काही फोटो समोर आले आहेत. 77 वर्षीय अमिताभ आजही बॉलिवूड मधला व्यस्त अभिनेत्यांपैकी एक आहे. कारकिर्दीत अमिताभने कितीही चित्रपट केले असले तरी त्यांचा ‘सूर्यवंशम’ हा चित्रपट टीव्हीवरील सर्वाधिक दाखवला जाणारा चित्रपट आहे.

काहीवेळा क्वचितच असे घडते की जेव्हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होतो आणि तेव्हा त्याला प्रेक्षक प्रतिसाद देत नाही, परंतु टीव्हीवर येताच तो हिट होतो. आणि याचे उदाहरण म्हणजे चित्रपट ‘सूर्यवंशम’. अमिताभ बच्चन आणि सौंदर्या यांच्या मुख्य भूमिकां असणारा हा चित्रपट 21 मे 1999 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता आणि तेव्हा तो प्रेक्षकांना अजिबात आवडला नाही. असे असूनही ‘सूर्यवंशम’ हा टीव्हीवरील सर्वाधिक पाहिलेला चित्रपट आहे.

टीव्हीवर ‘सूर्यवंशम’ खूप वेळा दाखवला गेला आहे, असा स्वतः अमिताभ सुद्धा म्हणतात. एकदा त्यांनी ट्विट करून लिहिले सुद्धा होते की, “मी अश्या बऱ्याच लोकांना भेटलेलो आहे ज्यांना हा चित्रपट आवडल आहे.” इतकेच नव्हे तर त्यांनी हे देखील सांगितले की ‘सूर्यवंशम’ हा ग्रामीण भारत मध्ये सर्वाधिक बघितत लेला चित्रपट आहे.

टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या या चित्रपटावर बऱ्याचदा सोशल मीडियावर विनोदही केले जातात. पण तुम्हाला हा चित्रपट दाखवण्या मागचे कारण काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का. खरं तर, ‘सूर्यवंशम’ रिलीज होताना, सेटमॅक्स वाहिनीने 100 वर्षांसाठी प्रसारित करण्याचे अधिकार विकत घेतले होते. यामुळेच अमिताभ बच्चन आणि सौंदर्या यांचा हा चित्रपट टीव्हीवर पुन्हा पुन्हा दाखवला जातो.

या चित्रपटाद्वारे अभिनेत्री सौंदर्या हिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यांनी या चित्रपटात अमिताभ बच्चन अर्थात हीरा ठाकूर यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. सौंदर्या अवघ्या 31 व्या वर्षी मरण पावली. सौंदर्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी करीमनगरला जात असतांना बंगळुरूच्या जक्कूर एअरफील्डवरून हेलिकॉप्टर उड्डाण घेतल्यानंतर 100 फूटांवर पोचल्यावर ते दुर्घटनाग्रस्त झाले. या अपघातात सौंदर्या, तिचा भाऊ आणि अन्य दोघांचा मृत्यू झाला. अपघातावेळी सौंदर्या सात महिन्यांची गरोदर होती.

Team Hou De Viral