….म्हणून जावेद जाफरी त्यांच्या वडिलांचा तिरस्कार करतात !

….म्हणून जावेद जाफरी त्यांच्या वडिलांचा तिरस्कार करतात !

बॉलिवूड मधला कॉमेडी करणारा अभिनेता जावेद जाफरी, जो बर्‍याच काळापासून आपल्या सर्वांचे उत्तमरीत्या मनोरंजन करत आहे. आज त्याचा 56 वा वाढदिवस आहे. अभिनया सोबतच जावेद जाफरी एक उत्तम डान्सर देखील आहे. तर वाढदिवसाच्या खास प्रसंगी त्याच्याशी संबंधित काही न ऐकलेल्या गोष्टी जाणून घेऊया.

जावेद जाफरी यांचे पिता जगदीप जाफरी हे बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते होते. शोले, अंदाज अपना अपना या यासारख्या सिनेमांमध्ये त्यांनी उत्तम अशी कामगिरी केली होती. पण जावेदने इंडस्ट्रीमध्ये आपल्या वडिलांचे नाव कधीच वापरलेले नाही.

होय हे खरं आहे, जावेद जाफरीने बॉलिवूडमध्ये स्वत: हिमतीवर आपले स्थान निर्माण केले आहे. असे बोलले जाते की जावेदला आपल्या वडिल मद्यपान करतात. जुगार खेळतात. या व्यसनाचा त्याला राग येतो. तारुण्यात वडिलांच्या या सर्व सवयींमुळे जावेद जाफरी खूप अस्वस्थ होते. ज्यामुळे दोघे बापलेकात संबंध काय ठीक नव्हते. पण आता दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे.

जावेद यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात ‘मेरी जंग’ या चित्रपटातुन केली. आणि या चित्रपटातील ‘बोल बेबी बोल रॉक एन रोल’ या गाण्यातील त्याच्या डान्स पाहून त्याच्या डान्सची प्रतिभा सर्वांसमोर आली. जावेद यांनी वीजे (VJ) च्या रुपात सुद्धा काम केले आहे आणि तो जाहिरात निर्माताही देखील आहे. तो ‘सलाम नमस्ते’, ‘ता रा रम पम’, ‘फायर’, ‘अर्थ’ आणि ‘3 इडियट’ या अश्या सुपरहिट चित्रपटात दिसला.

जावेदचे हबीबा जाफरीशी लग्न झाले आहे, त्यांना अलाविया जाफरी, मिजान जाफरी आणि अब्बास जाफरी अशी तीन मुले आहेत. जावेद जाफरी यांनी राजकारणात हात पाहिला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. आम आदमी पक्षाच्या तिकिटावर लखनऊमधून भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांच्याविरूद्ध लढले, परंतु त्यांना विजय मिळवता आला नाही.

जावेद यांनी अनेक पुरस्कार कार्यक्रमांचे प्रयोजन केले आहे ज्यात फिल्मफेअर, स्क्रीन, आयफा सारख्या पुरस्कार कार्यक्रमांचा समावेश आहे. पहिल्यांदाच ‘सलाम नमस्ते’ या चित्रपट मधील सर्वोत्कृष्ट कॉमिक भूमिका साठी त् याला आयफा पुरस्कार मिळाला होता.

Team Hou De Viral