या अभिनेत्यानंच केला खुलासा, इंटीमेट सीन करताना कशी होते अवस्था

या अभिनेत्यानंच केला खुलासा, इंटीमेट सीन करताना कशी होते अवस्था

चित्रपटात आपल्याला स्टार्स चा दिसणारा अभिनय हा खूप सोप्पा वाटत असतो. परंतु त्यामध्ये इंटिमेट सीन असेल तर अवघडच..आणि रुपेरी पडद्यावर इंटीमेट सीन देणे ही काय साधी सोपी गोष्टी नाही.

अश्याप्रकारचा सीन रेकॉर्ड करण्यासाठी स्टार्सना बऱ्याच अडचणींचा सामना हा करावा लागतो. आणि आजच्या या काळात इंटिमेट सीन काय फक्त आणि फक्त चित्रपट पुरते मर्यादित नाहीये. आपल्याला असे सीन आता मालिका तसेच वेब सीरिजमध्ये देखील बघायला मिळतात.

नुकताच अभिनेता दुलकर सलमानने इंटीमेट सीन देतानाचा त्याचा अनुभव सर्वांसोबत शेअर केला आहे. अभिनेता दुलकर याने नेहा धूपियाच्या ‘नो फिल्टर नेहा’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्याने नेहा संग खूप गप्पा मारल्या आणि त्याच्या जिवनातील काही मजेशीर गोष्टी शेअर केल्या.

दरम्यान त्याने असे ही सांगितले आहे की चित्रपटात जेव्हा आम्ही इंटीमेट सीन देत असतो तेव्हा मनात बऱ्यापैकी दडपण हे असते. तसेच असा सीन रेकॉर्ड करतांना त्याचे हात-पाय लटलट कापत असल्याचा खुलासा देखील दुलकर याने केला.

तो पुढे म्हणाला की ‘मी प्रत्येकवेळी याचाच विचार करतो की माझी जी को स्टार आहे ती काय विचार करत असेल की, मी यातून बाहेर पडायचा प्रयत्न करत आहे? महिलांना अशा गोष्टी लगेच कळतात. नंतर मला वाटतं की मी न्यूड आहे’

दुलकर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘द जोया फॅक्टर’ या चित्रपटात अभिनय केला आहे. या चित्रपटात सोनम कपूरने मुख्य भूमिका साकारली होती. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही चालला नाही.

Team Hou De Viral