फोटोत दिसणारी ही चिमुरडी मराठी चित्रपटसृष्टीवर करतेय राज्य, तिच्या सौंदर्यावर फॅन्स आहेत फिदा

कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा यांसारख्या दर्जेदार मराठी चित्रपटातून आपल्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांच्या ह्रदयात आपलं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असते.
तिच्या सोशल मीडियाच्या अकाउंट द्वारे ती चाहत्यांशी सतत संवाद साधत असते. आणि तसेच ती तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडिया अकाउंटवर फोटो, व्हिडिओ देखील शेअर करत असते.
प्रार्थनाचा नुकताच वाढदिवस झाला असून तिने तिचा हा वाढदिवस तिच्या अगदी जवळच्या मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत साजरा केला. वाढदिवसाच्या निमित्ताने तिने तिच्या बालपणीचे काही निवडक छायाचित्रे इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर पोस्ट केले असून त्या फोटोंमध्ये प्रार्थना खूपच छान दिसत आहे. तिने यामध्ये तिच्या पहिल्या संक्रातीचा, शाळेतील कार्यक्रमातील असे विविध फोटो शेअर केले आहेत.
प्रार्थना लहानपणीदेखील तितकीच सुंदर होती असे तिचे चाहते तिला कमेंटच्या करून सांगत आहेत. तिच्या या फोटोंना हजारोहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. तिच्या या बालपणीच्या फोटोंचीच सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.
प्रार्थनाचा पती अभिषेक जावकर हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डिस्ट्रीब्युटर आहे. त्याने काही चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केले आहे. ‘डब्बा एैस पैस’, ‘सॉल्ट आणि प्रेम’ यांसारख्या मराठी चित्रपटांची त्याने सहनिर्मिती देखील केली आहे.
प्रार्थनाने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याआधी ‘पवित्र रिश्ता’ मालिकेद्वारे छोटा पडदा गाजवला. त्यानंतर ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’ या मराठी सिनेमाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली. मालिका आणि रुपेरी पडद्यावर तिने आपल्या अभिनयाने रसिकांवर जादू केली आहे.