या आहेत अरुण गोविल यांच्या पत्नी, मराठी चित्रपटात त्यांनी काम केलं आहे.

या आहेत अरुण गोविल यांच्या पत्नी, मराठी चित्रपटात त्यांनी काम केलं आहे.

80 च्या दशकात रामायण या मालिकेने सगळ्यांनाच वेड लावले होते. कोरोना संकटाच्या पाश्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस आली असून या मालिकेला प्रेक्षकांचा तितकाच प्रतिसाद मिळत आहे.

रामायण या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी त्याकाळात अक्षरशः डोक्यावर घेतल्या होत्या. या मालिकेत रामाची भूमिका अरुण गोविल यांनी तर सीतेची भूमिका दीपिका चिखलियाने साकारली होती. त्या दोघांनीही आपल्या भूमिका इतक्या चांगल्या प्रकारे साकारल्या होत्या की, प्रेक्षक त्यांनाच राम आणि सीता समजून त्यांच्या पाया पडण्यासाठी जात असत.

या मालिकेने या दोघांनाही प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण अरुण आणि दीपिका यांच्या दर्शनासाठी लोक रांगा लावत असत. तसेच त्यांच्या दर्शनासाठी येताना देवळात ज्याप्रकारे आपण हार, अगरबत्ती, नारळ घेऊन जातो, त्याप्रमाणे लोक घेऊन येत असत.

अरुण गोविल यांना या मालिकेमुळे एक नवी ओळख मिळवून दिली. आज याच अरुण गोविल यांच्या पत्नीविषयी आम्ही तुम्हाला काही खास गोष्टी सांगणार आहोत. अरुण गोविल यांची पत्नी एक अभिनेत्री असून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

अरुण गोविल यांच्या पत्नीचे नाव श्रीलेखा असून त्यांनी हिम्मतवर, छोटा सा घर यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी धर्मेंद्र, गजेंद्र चौहान, मुकेश खन्ना यांसारख्या अभिनेत्यांसोबत चित्रपटांमध्ये काम केले आहे. एवढेच नव्हे तर त्या मराठी चित्रपटामध्ये देखील झळकल्या आहेत. आई पाहिजे या चित्रपटात त्यांनी रमेश भाटकर यांच्यासोबत काम केले होते.

अरुण गोविल यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात पहेली या चित्रपटापासून केली. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. अभिनयक्षेत्रात स्थिरावण्यासाठी ते संघर्ष करत असतानाच त्यांना सावन को आने दो या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटामुळे त्यांची एका आदर्श मुलाची प्रतिमा निर्माण झाली होती. त्यामुळेच त्यांना रामायणात काम करण्याची संधी मिळाली.

आमचे पेज लाईक करा.

Team Hou De Viral