या ‘5’ फायद्यांंसाठी आहारात नक्की करा मूगडाळीचा समावेश

या ‘5’ फायद्यांंसाठी आहारात नक्की करा मूगडाळीचा समावेश

मुगडाळ पचायला हलकी आणि आरोग्यदायी असल्याने आजारपणात मूगडाळीचे सूप, मूगडाळीचे वरण, मूगडाळीची खिचडी फायदेशीर ठरते. मुगाची डाळ खाणं जवळपास सर्वानाच पसंद असतं. ही डाळ चवीलाच चांगली असते. त्याने आरोग्यालाही खूप फायदा होतो. मुगाच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं.

1. पोटाचा त्रास – मूग पचायला हलका असल्याने अनेक समस्या कमी होण्यास मदत होते. त्यामधील फायबर पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत करते व पोटात गॅस जमा होण्याचं प्रमाण नियंत्रणात राहते.

2. सुरकुत्या – मूगडाळीमध्ये व्हिटॅमिन आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असतात. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. तसेच चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी मूग फायदेशीर आहे.

3. केसांच्या आरोग्यासाठी – मूगडाळीमध्ये कॉपर मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे केस मजबूत होण्यास मदत होते.

4. लठ्ठपणा – मूग भूकेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. मधल्या वेळेत लागणाऱ्या भूकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मूग खाणं फायदेशीर आहे.

5. बॉडी डिटॉक्‍स करण्यासाठी – मूगडाळीचं पाणी नियमित सेवन केल्याने शरीरातील टॉक्‍सिक बाहेर काढण्यास मदत करते. याने शरीराची आतून स्वच्छता होते. सोबतच डाळीचं पाणी प्यायल्याने लिव्हर, गाल ब्लाड्डेर, रक्त आणि आतड्यांची स्वच्छताही होते.

6. डायबेटिसमध्ये फायदेशीर – मुगडाळ ब्लड ग्लुकोज नियंत्रित ठेवण्यासही मदत करते.

मुगडाळ पाणी – मूगडाळीचं पाणी तयार करण्यासाठी 1 प्रेशर कुकर मध्ये 2 कप पाणी गरम करा. या गरम पाण्यात मुगडाळ टाका आणि चवी नुसार मीठ टाकून 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवा. त्यानंतर डाळ चांगली बारीक करा. त्यातील पाणी वेगळं काढा. डाळीचं पाणी पिण्यासाठी तयार आहे.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral