रंगरूप, चवीप्रमाणे आरोग्यासाठीही उत्तम… फायदे जाणाल तर दररोज खाल हे फळ

रंगरूप, चवीप्रमाणे आरोग्यासाठीही उत्तम… फायदे जाणाल तर दररोज खाल हे फळ

हिवाळा सुरू झाला की आपल्या जवळच्या मार्केट मध्ये लालेलाल स्ट्रॉबेरीज दिसायला लागतात. स्ट्रॉबेरीजचा हा लाल रंग व आकार आपल्यासारख्या सर्वसामान्याला छान वाटतो आणि आपण स्ट्रॉबेरीकडे आकर्षित होतो. असे रंगाने व चवीनं छान असणारे फळ चवीला आंबट-गोड असते.

म्हणूनच ज्याप्रकारे आपल्याला उन्हाळ्यात आंबा खाण्याचा मोह आवरत नाही तसेच थंडीमध्ये स्ट्रॉबेरीजचा मोह काही आवरत नाही. आणि स्ट्रॉबेरी हे फळ फक्त रंग, आकार व चवीलाच ही स्ट्रॉबेरी उत्कृष्ट नाही तर तुमच्या आरोग्यासाठीही उत्तम आणि फायदेशीर आहे.

हे आहेत स्ट्रॉबेरीज खाण्याचे जबरदस्त फायदे

बाकीच्या फळांप्रमाणेच स्ट्रॉबेरीतही व्हिटॅमिन C असते, आणि जेणेकरून रोगप्रतिकारक शक्ती वाढते, सर्दी व खोकल्या पासून आराम हा मिळतो. आर्थरायटिस फाऊंडेशनच्या मते, स्ट्रॉबेरीजचे सेवन केल्याने सांधेदुखी कमी होते.

स्ट्रॉबेरीजमुळे adiponectin आणि leptin या फॅट बर्निंग हार्मोनची निर्मिती वाढते. भूक, ब्लड शुगर कमी होते आणि या सर्वांचा परिणाम म्हणजे वजन कमी होतं. स्ट्रॉबेरीजमध्ये फायबर भरपूर असतात ज्यामुळे पचन सुधारण्यास मदत होते आणि मलावरोधाची समस्या उद्भवत नाही.

स्ट्रॉबेरीत असणारी अँटीऑक्सिडंट ही आपली केसगळती रोखण्यासाठी मदत करतात. केसांना मॉईश्चराइझ करतात व केसाचे कोंड्यापासून संरक्षण करतात. स्ट्रॉबेरीजत मॅलिक अॅसिड असते, जे आपले दात शुभ्र ठेवतात. व हा एक नैसर्गिक घटक आहे.

स्ट्रॉबेरीत आपल्या हृदयाला उत्तमरीत्या निरोगी ठेवणारे असे अँटिऑक्सिडंट असतात त्यामुळे हृदया बाबत असणाऱ्या आजारांचा आपल्याला धोका कमी होतो. रक्ताच्या गुठळ्या होत नाही, त्यामुळे स्ट्रोकचा धोका उद्भवत नाही. स्ट्रॉबेरीमध्ये आयोडिन, व्हिटॅमिन सी आणि फायटोकेमिकल्स असतात, ज्यामुळे nervous system चं कार्य चांगलं राहतं. मेंदूला योग्य रक्तपुरवठा होतो आणि मेंदूचं कार्य सुधारतं.

स्ट्रॉबेरीमुळे हायपरपिग्मेंटेशन, अॅक्ने यांचं प्रमाण कमी होतं. शिवाय त्वचेवरील मृतपेशी (dead skin cells)देखील निघून जातात. फ्री रेडिकल्सपासून त्वचेचं संरक्षण होतं, परिणामी त्वचा तरुण दिसते.नियमित स्ट्रॉबेरी खाल्ल्याने कोरडे डोळे, डोळ्यांमधील नसांना हानी पोहोचणे, डोळ्यांमध्ये दोष अशा समस्या बळावत नाहीत.

सोर्स – ऑर्गेनिक फॅक्ट

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

Team Hou De Viral