कधी 50 रुपयांसाठी राखी सावंत ने अंबानीच्या लग्नात वाढपी म्हणून काम केले होते, आज आहे करोडोंची मालकीण

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत 41 वर्षांची झाली आहे. 25 नोव्हेंबर 1978 रोजी जन्मलेल्या राखीने बॉलिवूडशिवाय इतर भाषांच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. फिल्म मिळविण्यासाठी राखीचा प्रवास सोपा नव्हता. ती अशा एका कुटुंबातली आहे जिथे महिलांना घराबाहेर पाऊल टाकण्यासही परवानगी नव्हती.तरीही तिने कुटुंबाविरूद्ध जाण्याचा निर्णय घेतला. इतकेच नाही तर राखीला आपला लूक बदलण्यासाठी शस्त्रक्रिया आणि ब्रेस्ट इम्प्लांटदेखील केले आहे, पण तरीही ती बॉलिवूडमध्ये फक्त एक आयटम गर्ल राहिली.
जेव्हा राखीने अंबानींच्या लग्नात 50 रुपायांसाठी जेवण वाढपीच काम केले होते – राखी सावंत ने एका मुलाखतीत सांगितले की, ती अशा कुटूंबातुन आलेली आहे जिथे महिलांना कोणतीही सूट दिली जात नाही. तिच्या कुटुंबातील कोणत्याही महिलेला पुरुषाशी डोळ्याला डोळे देऊन बोलण्याची परवानगी नाही. तिने एका मुलाखतीत असेही सांगितले होते की लहान मानसिकता असूनही घरगुती मुलींना पैसे कमावण्याच्या नावाखाली काहीही करायला लावत असत.वयाच्या दहाव्या वर्षी या कुटुंबाने व्यापारी अनिल अंबानीच्या लग्नात राखीला जेवण वाढपी म्हणून कामाला पाठवले होते. या केटरिंगच्या कामासाठी तिला रोज 50 रुपये मिळत असायचे.
जेव्हा राखीच्या आई आणि मामाने त्यांचे केस कापले – राखी म्हणाली, ‘जेव्हा मी फिल्म इंडस्ट्रीत नोकरी शोधू लागले तेव्हा माझ्याकडे चांगल्या प्रकारचे कपडेसुद्धा नव्हते. मी काहीही परिधान करत असे आणि लोकांना भेटायची. अशीच आणखी एक गोष्ट आहे की असेच कपडे आज फॅशनमध्ये आहेत ‘. वृत्तानुसार, राखीच्या आई आणि मामा यांनी राखीने दांडिया खेळयाचा आग्रह केल्यामुळे वयाच्या 11 व्या वर्षी तिचे लांब केस कापले होते. त्याच दिवशी तिने आपल्या कुटुंबाविरूद्ध काम करण्याचे ठरवले होते.
तिने नायिका होण्यासाठी घर सोडले, परंतु – अभिनेत्री होण्याच्या इच्छेने राखीने घर सोडले. जेव्हा ती मुंबईत आली तेव्हा तिने बऱ्याच निर्मात्यांना भेट घेतली. लुकमुळे नोकरी मिळाली नाही म्हणून तिने चेहरा शस्त्रक्रिये बरोबरच ब्रेस्ट इम्प्लांटसही केली. इतके केल्यानंतर राखीला काम मिळाले पण ती केवळ आयटम गर्ल बनुनच राहिली.
आज राखी 15 करोडच्या मालमत्तेची मालकीन आहे – इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, राखी जवळपास 15 कोटी मालमत्तेची मालक आहे. तिच्याकडे मुंबईत दोन फ्लॅट आणि एक बंगला आहे, ज्याची किंमत सुमारे 11 कोटी रुपये आहे. याशिवाय तिच्याकडे 22 लाख रुपये किमतीची फोर्ड एंडेव्हर कार आहे. राखी बहुतेक पैसे हे स्टेज परफॉर्मन्समधून मिळवते.
राखीने तिच्या कारकीर्दीची सुरुवात 22 वर्षांपूर्वी केली होती – राखीने तिच्या कारकीर्दीची सुरूवात 1997 च्या ‘अग्नि चक्र’ या चित्रपटाद्वारे केली होती. राखीने चित्रपटांमध्ये अनेक हिट आयटम नंबर्स केले आहेत. त्यामध्ये ‘जोरू का गुलाम’, ‘जिस देश में गंगा रहता है’, ‘गौतम-गोविंदा’, ‘दम’, ‘चुरा लिया है तुमने’, ‘मै हू ना’, ‘मालामाल वीकली’, ‘क्रेजी 4’, ‘ ‘लूट’ सारख्या चित्रपटात काम केले.
या रियालिटी शोमध्ये काम केले राखीने – राखी बिग बॉस व्यतिरिक्त ‘नच बलिये 3’, ‘ये है जलवा’, ‘अरे दीवाने मुझे पहचानो’, ‘राखी का स्वयंवर’ या रियालिटी शोमध्ये दिसली आहे. ‘राखी का स्वयंवर’ या रिअॅलिटी शोमध्ये राखीने कॅनेडियन स्पर्धक इलेश पारूजनवालाशी लग्न केले. मात्र, काही महिन्यांनंतर त्यांनी वेगळ होण्याची घोषणा केली.