“रात्रीस खेळ चाले” या मालिकेतील दत्ता आहे या अभिनेत्रीचा पती!!

“रात्रीस खेळ चाले” या मालिकेतील दत्ता आहे या अभिनेत्रीचा पती!!

रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दुसऱ्या भागाला सध्या ही प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. या मालिकेतील अण्णा, शेवंता, दत्ता, सविता, पांडू या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. तसेच सध्या भारतात लॉकडाऊन असल्याने कोणत्याही मालिकांचे चित्रीकरण होत नाहीये.

त्यामुळे जुन्या मालिका प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळत आहे. रात्रीस खेळ चाले या कार्यक्रमाचा पहिला सिझन सध्या प्रेक्षकांना झी युवा वाहिनीवर पाहायला मिळत आहे. या दोन्ही सिझनमध्ये आपल्याला दत्ता मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे.

सुहासच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीचे नाव स्नेहा माजगांवकर असून ती दिसायला खूपच सुंदर आहे. ती सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. तिचे आणि सुहासचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर नेहमीच पोस्ट करत असते.

स्नेहा देखील एक अभिनेत्री असून तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने झी युवाच्या कट्टी बट्टी या मालिकेत काम केले होते. तसेच माझे पती सौभाग्यवती या मालिकेतील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते.

कधीतरी चिडणारा पण तितकाच प्रेमळ दत्ता प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. या मालिकेत दत्ताची भूमिका सुहास शिरसाट साकारत असून या मालिकेत त्याची पत्नी सविता असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. आज आम्ही तुम्हाला दत्ताच्या म्हणजेच सुहासच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीविषयी सांगणार आहोत.

सुहासने रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या आधी २०-२५ तरी चित्रपटांमध्ये काम केले. पण त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता या मालिकेनेच मिळवून दिली. विशेष म्हणजे तो मुळचा बीडचा असला तरी या मालिकेत अस्स्खलित मालवणी भाषेत बोलतो.

आमचे पेज लाईक करा.

Team Hou De Viral