रामायणातील ‘शूर्पणखा’ पाहा आता कशी दिसते, राक्षसा सारख हसून मिळवले होते हे पात्र

रामानंद सागर निर्मित रामायण पुन्हा एकदा दूरदर्शनवर प्रसारित होत आहे. 33 वर्षानंतर रामायण पुन्हा एकदा आपल्यासाठी टीव्हीवर बघायला मिळत आहे. या सीरियलला आज ही तितकेच प्रेम मिळत आहे जेवढे त्याकाळी मिळत होते. मालिकांमधील सर्व पात्रे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत.
रामानंद सागर यांच्या निर्मित रामायणातही शूर्पणखाचे पात्र खूप लोकप्रिय झाले होते. अभिनेता रेणू धारीवाल यांनी शूर्पणखाची भूमिका साकारली होती. चला तर बघूया आता टीव्हीवर दिसणारी ‘शूर्पणखा’ कशी दिसते.
रेणू धारीवाल यांनी वयाच्या 22 व्या वर्षी शूर्पणखाची भूमिका साकारली होती. आणि आता त्या 56 वर्षांच्या झालेल्या आहेत. लग्नानंतर रेणू या खानोलकर झाल्या. रेनू खानोलकर यांना एक 23 वर्षांचा मुलगा आहे. अभिनयात नाव मिळवल्यानंतर रेणू राजकीय क्षेत्रात उतरली. त्या कॉंग्रेस पक्षाशी संबंधित आहेत.
रेणूने ‘इंडियन एक्स्प्रेस’ शी बोलताना सांगितले होते की वडिलांशी 20 वर्षांची असतानाच खोटे बोलून ति मुंबईला आली. तिला अभिनय करायचा होता. तिने मुंबईतील रोशन तनेजा अॅक्टिंग स्कूलमध्ये शिक्षण घेतले. गोविंदा तिथे तिचा वर्गमित्र होता.
रेणु थिएटरमध्ये खूप काम करायची. त्याचवेळी रामानंद सागर यांची नजर तिच्यावर पडली आणि त्यांनी तिला ऑडिशनसाठी कार्यालयात बोलावले. रेणूला सांगण्यात आले की ऑडिशनमध्ये तुम्हाला फक्त राक्षसांसारखे हसावे लागेल. रेणूने या प्रसंगी एकटिंग करून दाखवली आणि रामायणात शूर्पणखाची भूमिका मिळवली. रामायणानंतर रेणू खानोलकर काही चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्येही दिसली होती.
आमचे अजून आर्टिकल वाचण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा.