रोज गुळाचा एक खडा खाण्याचे 6 आरोग्यदायी फायदे

रोज गुळाचा एक खडा खाण्याचे 6 आरोग्यदायी फायदे

प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषध म्हणून गुळाचा वापर होत आहे. भारतातील सर्वाधिक लोक जेवणानंतर गूळ खातात. गूळ हा चवीला गोड आहे, त्याचबरोबर तो पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत करतो.

थंडीच्या दिवसात गूळ खाणे गरजेचे आहे, कारण गुळामुळे थंडीपासून संरक्षण होते. गुळामध्ये लोहाचं प्रमाण अधिक असतं. प्राचीन काळात साखरेऐवजी गुळाचा वापर जास्त केला जायचा, कारण गूळ हा साखरेपेक्षा स्वस्त आणि खूप फायदेशीर आहे. यासोबत जेवणातही गोडी आणण्यासाठी अनेक घरांमध्ये गुळाचा वापर केला जातो. या गुळाचे फायदे जाणून घ्या.

1.अॅनिमियावर गूळ फायदेशीर आहे – गुळाचे नियमित सेवन केल्यामुळे शरीरात आयर्नची कमतरता भासत नाही. तसंच अॅनिमियामुळे त्रासलेल्यांसाठी गूळ खूप फायदेशीर आहे. त्यांनी गूळ खोबर, गुळ शेंगदाणे असे पदार्थ खाल्ले तर शक्ती वाढण्यासाठी मदत होते.

2.पचनक्रिया मजबूत राहते – गुळामुळे पचनक्रिया मजबूत राहते. नियमित गूळ खाण्याने बद्धकोष्ठतेची समस्या नष्ट होते आणि गॅसचा त्रास होत नाही.

3.रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत – गुळाचा खडा खाऊन पाणी प्यायल्यानं तहान भागते. खोकला सर्दीसारख्या आजारांमध्ये गूळ खायला दिला जातो. गूळचा गुणधर्म उष्ण आहे. त्यामुळे गूळ खाल्ल्यानं शरीरात ऊर्जा निर्माण होते. रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

4.गुळामुळे त्वचा उजळते – चेहऱ्यावरील डाग नष्ट करण्यासाठी गूळ खूप उपयुक्त आहे. गूळाचा नियमित वापर केल्याने चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर होतात आणि चेहरा निखरतो.

5.सांधेदुखीपासून संरक्षण – पावसाच्या आणि थंडीच्या वातावरणामुळे सांधेदुखीच्या तक्रारी सुरू होतात. उन्हाळ्यातसुद्धा या तक्रारी दिसून येतात. यावर गूळ हा गुणकारी आहे. जर वेदना जास्त असतील तर आलं आणि गूळ एकत्र करुन खा किंवा 1 ग्लास गरम दुधात गूळ टाकून प्यायल्यानेसुद्धा आराम मिळेल.

6.मधुमेहावर गुणकारी गूळ – गूळ साखरेच्या तुलनेत खूप फायदेशीर आहे. गुळामध्ये कॅल्शियम आणि लोह जास्त प्रमाणात असल्यामुळे शरीरात साखरेचे प्रमाण संतुलित राहते.

Team Hou De Viral