लग्नाला काही दिवस उरले असताना या मराठमोळ्या अभिनेत्रीनं बॉयफ्रेंडसोबत केलं लिपलॉक

लग्नाला काही दिवस उरले असताना या मराठमोळ्या अभिनेत्रीनं बॉयफ्रेंडसोबत केलं लिपलॉक

‘मे आई कम इन मॅडम’ या टीव्ही मालिकेची अभिनेत्री नेहा पेंडसे यांच्यासाठी नवीन वर्षाची सुरुवात एका हटके पद्धतीने झाली आहे.

एक्स बिग बॉस स्पर्धक आणि कपिल शर्माची सहकारी अभिनेत्री असलेली नेहा नववर्षाच्या संध्याकाळी तिचा होणारा नवरा शार्दुल बायससोबत होती. शार्दूलला किस करत नेहाने सोशल मीडियावर एक सुंदर फोटो शेअर केला आहे.

नेहाने एक रोमँटिक फोटो पोस्ट केला – या फोटोमध्ये नेहा एक लुकलुकणारा निळा ड्रेस परिधान केला आहेद. शार्दुल बायस तिच्याबरोबर आहेत. हे दोघे एकमेकांना किस करत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘कारण ही एका सिंगल असणाऱ्या मुलीची शेवटचे चुंबन आहे- कॅरी ब्रॅडशॉ.’

नेहा आणि शार्दुल 5 जानेवारी 2020 रोजी महाराष्ट्रीयन पध्दतीने लग्न करणार आहेत. या दोघांच्या लग्नाची तयारी सुरू असून बाकीच्या लग्नकामाची लगबग सुरू झाली आहे. नेहा पेंडसे यांच्या लग्नाच्या विधींशी संबंधित फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नेहा तिच्या लग्नामुळे खूप खुश आहे – टाईम्स ऑफ इंडियाशी लग्नाबद्दल बोलताना नेहा म्हणाली, ‘मी माझ्या आयुष्याच्या या टप्प्यावर खूप आनंदी आहे. मी माझ्या स्वप्नांतल्या माणसाशी लग्न करत आहे आणि एका नवीन आणि चांगल्या कुटुंबाचा भाग होणार आहे.

ते खूप चांगले लोक आहेत आणि मी त्यांच्याबरोबर माझे जीवन सुरू करण्याची प्रतीक्षा करू शकत नाही. माझी आत्तापर्यंतची ही सर्वोत्तम भावना आहे.

नेहा पेंडसे तिचे कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न करणार आहे. त्यांचे पुण्यात लग्न होणार आहे. हा तीन दिवसांचा उत्सव असेल, ज्यामध्ये मेहंदी, संगीत आणि लग्नाच्या इतर विधी पूर्ण केल्या जातील. नेहा आणि शार्दूल बर्‍याच दिवसांपासून एकमेकांसोबत आहेत. शार्दूलचा एंटरटेनमेंट उद्योगाशी काही संबंध नाही.

Team Hou De Viral