लता दिदींच्या एका गाण्याने रातोरात महिला झाली फेमस,बघा आता झालेला बदल !

सोशल मीडिया हे एक असे व्यासपीठ आहे. जिथे कोणतीही व्यक्ती क्षणात प्रसिद्ध होते. दररोज बरेच लोक सोशल मीडियाद्वारे देखील प्रसिद्ध होत आहेत. नुकतेच रानू मंडल बाबतही असेच काहीसे घडले आहे.माहितीसाठी सर्वात आधी सांगूतो की काही दिवसांपूर्वी रानू मंडलाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये ती लता मंगेशकर यांच्यासारखी गाणं गातांना दिसली होती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वजण तिच्या आवाजाचे कौतुक करीत होते.
रानू मंडल नावाची ही महिला पश्चिम बंगालमधील रानाघाट स्थानकात काम करायची. पण आता त्यांनी लता मंगेशकर यांचे ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणे गाऊन लाखो लोकांची मने जिंकली आहेत. या महिलेचा पहिला व्हिडिओ फोनवर रेकॉर्ड करण्यात आला होता आणि तो फेसबुकवर शेअर करण्यात आला होता. यानंतर, समजेच नाही की हा व्हिडिओ कधी इतका व्हायरल झाला.व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, रानू रातोरात इंटरनेट वर व्हायरल झाली आणि तसेच स्टार सुद्धा.
आज, रानूकडे बर्याच मोठ्या कामाच्या ऑफर येत आहेत.
अहवाल असा आला आहे की रानू मंडलाला बऱ्याच मोठ्या कार्यक्रमांच्या ऑफर्सही आल्या आहेत. आश्चर्य म्हणजे रानूला आता ओळखणे कठीण झाले आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता रानूचा संपूर्ण मेकओवर झाला आहे.अलीकडील रानूचे काही फोटो सोशल मीडियावरही व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये आपण पाहू शकता की ती पूर्वीपेक्षा आता बर्यापैकी बदलली आहे.रानूच्या नव्या लूकचे फोटोही सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.अलीकडील फोटो आणि व्हिडीओ पाहता तुम्हाला वाटेल की बंगालच्या रानाघाट रेल्वे स्थानकात गाणे गाऊन ती आपले आयुष्य कधीच जगत नव्हती. रानुचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत रानूचा बदललेला लुक पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.