लाल सफरचंदापेक्षा हिरवे सफरचंद खाण्याचे हे आहेत जबरदस्त फायदे वाचून व्हाल अवाक्….

लाल सफरचंदापेक्षा हिरवे सफरचंद खाण्याचे हे आहेत जबरदस्त फायदे वाचून व्हाल अवाक्….

आपल्या उत्तम आरोग्यासाठी दररोज सफरचंद खाल्लेले चांगले असते. असे आपण पहिल्यापासून किव्हा अनेकदा ऐकत आलो आहोत. परंतु या तुलनेने हिरवे सफरचंद खाणे कधीही आपल्या शरीरासाठी जास्त फायद्याचे आहे.

हिरवेगार सफरचंदं हे सुद्धा लाल सफरचंदा प्रमाणेच गोड असतात. परंतु जास्त करून लोक हिरवी सफरचंद खात नाहीत. हिरवे सफरचंद हे लाल सफरचंदाच्या तुलनेत महाग असते. परंतु या हिरव्या सफरचंदात मोठ्या प्रमाणात लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि अनेक प्रकारचे अँटी ऑक्सिडंट्स असतात.

हिरव्या सफरचंदाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. चला तर मग जाणून घेऊया हिरव्या सफरचंदाचे फायदे काय आहेत.

दररोज डाएटमध्ये सामील केल्यास तुम्ही उत्साही रहाल. हिरव्या सफरचंदात काही अॅन्टीएजिंग गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमचं तारुण्य दीर्घकाळ टिकून राहतं.

त्याचप्रमाणे पचनसंस्था सुरळीत राहते. हिरव्या सफरचंदामुळे शरीरातील टॉक्सिन बाहेर निघण्यास मदत होते. यातील फायबर सोप्या पद्धतीने पचले जातात. यामुळे चयापचय क्रियेचा वेगही वाढतो. तसेच वेगाने वजन कमी होण्यास मदत होते.

गर्भवती स्त्रीला ह्या दिवसात मलावरोधाची व पचनाची खूप समस्या येत असते. आणि ही समस्या सर्वच स्त्रियांना येत असते. म्हणून जर तुम्ही ह्या वेळी हिरवे ऍपल खाल्ले तर ही समस्या येत नाही.

ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, अशा व्यक्तींना सफरचंदाचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. हिरव्या सफरचंदातील पोषक तत्त्वांमुळे रक्तातील शर्करा नियंत्रित येते.

Team Hou De Viral