वजन कमी करण्यासाठी ते पोटाच्या समस्यांसाठी फायदेशीर आहे ज्वारीची भाकरी, जाणून घ्या कशी….

वजन कमी करण्यासाठी ते पोटाच्या समस्यांसाठी फायदेशीर आहे ज्वारीची भाकरी, जाणून घ्या कशी….

दररोजच्या या दगदगीच्या जीवनात आपण अनेकदा आपल्या आरोग्याकडे, खाण्यापिण्याकडे दूर्लक्ष करतो आणि तेच तेच खाऊन कंटाळलेलो असतो.जर तुम्हाला काहीतरी वेगळं खायची इच्छा होत असेल तर एकदा ज्वारीची भाकरी खाऊन बघा. ज्वारीची भाकर ही आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.

दररोज चपाती खाऊन खाऊन माणूस अनेकदा चपातीला कंटाळतो. तर तुम्ही ज्वारीच्या भाकरी बरोबर झूणका अथवा एखादी झणझणीत मस्त भाजी तयार करून मस्त जेवणाचा बेत करू शकता. चपाती तयार करण्याच्या तुलनेत भाकरी बनवायला कमी वेळ लागतो.

तुम्हाला जर तुमचे वजन कमी करायचे आहे तर ज्वारीची भाकर तुम्हाला फायदेशीर ठरेल. चला तर मग जाणून घेऊया ज्वारीच्या भाकर खाण्याचे फायदे काय काय आहेत.

मोठ्या प्रमाणात पोषक घटक असतात – ज्वारीच्या भाकरत प्रथिनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून, पिष्टमय घटक, शर्करा आणि खनिजद्रव्ये अधिक प्रमाणावर आढळून येतात. ज्वारीचे सेवन रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त असते त्यामुळे तुम्ही ज्वारीची भाकरी खात नसाल तर आजच तुमच्या आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश करा आणि त्याचे फायदे घेण्यास सुरुवात करा.

वजन कमी करण्यात फायदेशीर – ज्वारीच्या भाकरीचे पीठ हे ग्लुटेन फ्री असतं. आणि म्हणूनच ज्या लोकांना स्वतःचे वजन कमी करण्याची इच्छा आहे. त्यांनी त्यांच्या आहारामध्ये ज्वारीच्या भाकरीचा समावेश करावा. ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्‌सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास ऊर्जा मिळते. थोडेसे खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. तसेच जेवणात ज्वारीचे सेवन केल्यास लठ्ठपणा (अतिरिक्त चरबी) कमी होण्यास मदत होते.

पोटाच्या तक्रारी दूर करण्यासाठी – ज्वारीत असणाऱ्या अमिनो ऍसिड्‌समधून शरीरास मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स मिळून जातायत. आणि तसेच फायबर्स असल्याने ते पचायला सोप्पे असते. ज्या लोकांना द्धकोष्ठतेचा त्रास आहे अशा व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लावून घ्यावी ज्वारी पचायला हलकी असते. ज्वारीच्या भाकरीचे सेवनं केल्याने पाचनक्रिया सुरळीत राहते.

आजारांपासून बचाव – ज्वारीचे पदार्थ खाल्ल्याने ब्रेस्ट कॅन्सर कंट्रोल मध्ये राहतो, आणि अलीकडच्या रिसर्चमधून सिद्ध झाले आहे. ज्वारीच्या भाकरीचे अनेक गुणधर्म आहेत, ज्यामुळे रोगांपासून बचाव करता येतो म्हणून ज्वारीच्या भाकरीचं सेवन करणं लाभदायक ठरतं.

Team Hou De Viral