‘शाळा’ चित्रपटातला मुकुंद दिसतोय आता ‘लै भारी’, पहा त्याचे फोटो

‘शाळा’ हा चित्रपट सुजय डहाके यांनी दिग्दर्शित करून प्रेक्षकांना त्यांच्या शाळेच्या दिवसाच्या आठवणींना उजाळा दिला.
तसेच या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात मोठे स्थान निर्माण केलं. तसेच शाळा या चित्रपटात दिसणारी बालकलाकार अंशुमन जोशी आणि केतकी माटेगावकर यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना लै आवडली होती. या यशस्वी चित्रपटा नंतर केतकी माटेगावकर अनेक चित्रपटात दिसली. परंतु अंशुमन जोशी हा फारसा सिनेसृष्टीत काय झळकला नाही.
अंशुमन जोशी याने शाळा ह्या चित्रपटामध्ये मुकुंद जोशी ची भूमिका केली होती. सोशल मीडिया त्याचे दिसणारे हे फोटो पाहून आता त्याला ओळखणे सुद्धा अवघड जात आहे.
आता तो खूपच हॅण्डसम आणि वेगळा दिसत आहे.’शाळा’ चित्रपटामध्ये त्याने साकारलेलं अल्लड वयातलं प्रेम आजही त्याच्या अभिनय क्षमतेची आठवण करून देतो. अंशुमन जोशी हा मूळच्या सोलापूरकर मुलाने शाळेतलं अवघं विश्वच आपल्यासमोर उभं केलं. मिलिंद बोकिल यांच्या ‘शाळा’ या कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे.
सुजय डहाके दिग्दर्शित ‘शाळा’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळाला होता. आणि जबराट अभिनयासाठी अंशुमन जोशीला पुरस्कार सुद्धा मिळाला होता.शाळा या चित्रपटानंतर सुद्धा त्याने थोड्याफार चित्रपटांत काम केले आहे.
‘म्हैस'(२०१२), ‘फुंतरू'(२०१६), ‘फास्टर फेणे'(२०१७) यासारख्या मोजक्याच मराठी चित्रपटांत त्याने काम केलेले आहे. ‘शाळा’नंतर अंशुमन ‘फोटोकॉपी’ या चित्रपटात एका वेगळ्याच अंदाजात दिसला. मराठी शिवाय अंशुमनने इरफान खान, मिथिला पालकर व दलकीर सलमान यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट कारवांमध्ये सुद्धा काम केलं आहे.