शेवग्याच्या शेंगा डोक्यापासून पायापर्यंत आजारांचं औषध, जाणून घ्या आर्श्चयजनक फायदे

शेवग्याच्या शेंगा डोक्यापासून पायापर्यंत आजारांचं औषध, जाणून घ्या आर्श्चयजनक फायदे

आयुर्वेदात शेवग्याच्या शेंगांना अमृत मानलं जातं, याच कारण की शेवग्याच्या शेंगा या तीनशेहून अधिक आजारांचे औषध आहे. विशेष म्हणजे त्याची भाजीही खूप चवदार लागते तसंच रोगांच्या उपचारासाठीही ती खूप उपयुक्त आहे. दक्षिण भारतीय घरांमध्ये शेवग्याच्या शेंगाचा जास्त वापर केला जातो.त्याची मऊ पाने आणि फळे दोन्ही भाज्या म्हणून वापरतात. याच्या काड्या, हिरवी पानं आणि सुकलेल्या पानांमध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, पोटॅशिअम, आयरन, मॅग्नीशियम, व्हिटामिन-ए, सी आणि बी कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात असतात.

शेवग्याच्या शेंगा कीती महत्त्वाच्या आहेत ते जाणून घ्या

पोटदुखी किंवा गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता यासारख्या पोटाशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्येमध्ये याचा रस प्या किंवा याची भाजी बनवून खा. यामुळे पोटाच्या समस्या दूर होतात.

जर दृष्टी कमी होत असेल तर शेवग्याच्या शेंगा, त्याची पाने आणि फुले अधिकाधिक वापरावीत. शेवग्याच्या शेंगाचा वापर सायटिका, संधिवात इत्यादींसाठी खूप फायदेशीर आहे. याची साल आणि पानांचा काढा करुन पिण्यास सुरू करात. त्यासोबतच याची भाजी सुद्धा खा.

यकृत निरोगी ठेवण्यातही हे खूप प्रभावी आहे. लचक भरली असेल तर याची पानं बारीक वाटून घ्या आणि त्याचा रस मोहरीच्या तेलात मिसळवा आणि लचक भरलेल्या जागेवर बांधून ठेवा. यामुळे दुखणं आणि सूज सुद्धा कमी होते.

कानात होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठीही शेवग्याच्या शेंगा खूप उपयुक्त आहेत. यासाठी त्याची ताजी पाने तोडून घ्या आणि त्याच्या रसातील काही थेंब कानात घाला.

ज्या लोकांना मूत्रपिंडांचा किंवा किडनी स्टोनचा त्रास होतो, त्यांनी डशेवग्याच्या शेंगाची भाजी आणि त्याचा सूप प्यावा. यामुळे किडनी स्टोन निघून जातो.

लहान मुलांच्या पोटात जंतू झाले असल्यास त्यांना याच्या पानांचा रस द्यावा. तसेच अतिसार झाल्यास हा रस प्या. शेवग्याच्या शेंगा ब्लडप्रेशर सामान्य करतो. हे हृदयरोगामध्येही खूप फायदेशीर आहे. कोलेस्ट्रॉल देखील कमी करतं.

याशिवाय पानांचा रस प्यायल्यानं वजनही कमी होते. यात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. शेवग्याच्या शेंगाचा सूप किंवा भाजी खाल्ल्यास ते ब्लड प्यूरिफायर म्हणून कार्य करते. कॅन्सरसारख्या आजारांमध्येही हे खूप फायदेशीर आहे.

Team Hou De Viral