बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्री सोबत शूटिंग करत आहे सई ताम्हणकर, मराठी सिनेमाचा रिमेक आहे हा चित्रपट

बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्री सोबत शूटिंग करत आहे सई ताम्हणकर, मराठी सिनेमाचा रिमेक आहे हा चित्रपट

सई ताम्हणकर ने गेल्या काही काळातच मराठी चित्रपटसृष्टीत आपले एक महत्वाचे स्थान निर्माण केले आहे. तिने माघील काळात उत्तर असा अभिनय करून प्रेक्षकांच्या मनात राज्य निर्माण केले आहे.तसेच तिने अनेक दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. ती सोशल मीडियावर बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असते आणि त्याच्याच माध्यमातून ती तिच्या फॅन्सच्या मोठ्या प्रमाणात संपर्कात असते.

सई ताम्हणकर आणि कृती सॅनन
सई ताम्हणकर आणि कृती सॅनन

लक्ष्मण उतेकर यांच्या मिमी या सिनेमामध्ये सई दिसणार आहे असे समजले आहे. मराठीतला ‘मला आई व्हायचंय’ या चित्रपटावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात क्रिती सॅनन, पंकज त्रिपाठी यांच्या मुख्य भूमिका आहे. लक्ष्मण उतेकर यांनी याआधी लुका छुपी सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. हा त्यांचा दुसरा हिंदी सिनेमा आहे.

सई ताम्हणकर
सई ताम्हणकर

सई ताम्हणकर ने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा आणि कृती सॅनन सोबतचा फोटो शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. परंतु चित्रपटात सई कोणती भूमिका साकारणार आहे अद्याप ही गुलदस्त्यातच आहे.

हिंदी चित्रपटात बरोबरच सई ताम्हणकर लवकर ‘पाँडेचेरी’ या मराठमोळ्या सिनेमामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत वैभव तत्त्ववादी, अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, नीना कुलकर्णी हे मोठे कलाकार झळकणार आहेत. आणि खास म्हणजे या सिनेमाचे बरेचसे शूटिंग पाँडेचेरीमध्ये करण्यात आले आहे.

सचिन कुंडलकर व तेजस मोडक यांनी या चित्रपटाची कथा लिहली असून हा एक कौटुंबिक विषयावर आधारित चित्रपट आहे.सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

तिने दुनियादारी, बालक पालक, वजनदार यांसारख्या मराठी चित्रपटात तर हंटर, गजनी यांसारख्या हिंदी चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

आमचे इतर आर्टिकल्स :-

Bollywood च्या खलनायकांच्या मुली राहतात कॅमेरा पासून दूर, पण एकाची मुलगी आहे बॉलिवूडची फेमस अभिनेत्री

तुम्हाला माहीत आहे का या स्टार्सचे पूर्ण नाव, आडनाव हटवण्याचे कारण जाणून हैराण व्हाल

नागार्जुन च्या पोराचे कधीकाळी ‘या’ सुपरस्टारच्या पोरीशी होते संबंध, लग्नापर्यंत पोहचली होती गोष्ट पण अचानक …….

बॉर्डर चित्रपटातील अभिनेते पहा आता कसे दिसतात, बघा नवा आणि जुना मेकओवर !

 

Team Hou De Viral