सकाळी रिकाम्या पोटी चहा-कॉफी पिणं घातकच, ‘या’ ड्रिंकने करा दिवसाची सुरुवात

आपल्यापैकी बर्याक जणांना दररोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर चहा किंवा कॉफी प्यायची सवय असते. आणि जे लोक सकाळी उठल्यावर चहा-कॉफी घेतात त्यांच्या मते चहा कॉफी प्यायल्यानंतर त्यांना फ्रेश वाटतं, शरीरात ऊर्जा येते व आपल्या दिवसभराच्या कामासाठी तयार झालो आहोत.
जरी आपली चहा-कॉफीचे सेवन केल्याने दिवसाची सुरुवात ही चांगली होत असेल, तरी दररोज सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणं तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही. यामुळे पोटाच्या बाबतच्या समस्या तुम्हाला जडू शकतात, तुमचे वजन वाढू शकतं. मग आता तुम्ही विचार कराल की दररोज सकाळी चहा-कॉफी प्यायची नाहीतर नेमकं कायप्यायचं ? याचं उत्तर आहे जिऱ्याचं पाणी.
जिऱ्याचं पाणी सकाळी रिकाम्या पोटी का प्यावं?
जिऱ्याचं पाणी सकाळी प्यायल्याने पोटाच्या बाबत असणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळेल. जिऱ्याच्या पाण्यात कॅलरीज खूप कमी असतात, एक चमचा जिऱ्यामध्ये ७ कॅलरी असतात. ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांच्यासाठी तर जिऱ्याचं पाणी अधिक फायदेशीर ठरू शकतं.
दररोज सकाळी जर एक ग्लास जिऱ्याचं पाणी प्यायल्याने शरीराला आवश्यक प्रमाणात कॉपर, मँगनीज, मिनरल्स मिळतात
जिऱ्याचं पाणी कस तयार कराल?
तांब्याच्या भांड्यात एक ग्लास पाणी घ्या व त्यामध्ये एक चमचा जिरं टाका आणि रात्रभर ठेवा. आणि सकाळी हे पाणी गाळून घेऊन प्या.
जिऱ्याचं पाणी हे लाईट ड्रिंक आहे, त्यामुळे चहा-कॉफीऐवजी सकाळी हे पाणी प्यायल्यात तर तुम्हाला दिवसभरासाठी ऊर्जा मिळेल, दिवसभर तुम्ही अॅक्टिव्ह राहाल.
सूचना- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.