सतत डोक्यात खाज येत असेल तर आजच करा हे उपाय

सतत डोक्यात खाज येत असेल तर आजच करा हे  उपाय

हिवाळ्यामध्ये आपल्या डोक्याची त्वचा कोरडी पडत असते आणि त्यामुळे आपल्या डोक्यामध्ये सतत खाज सुटलेली असते. हिवाळ्यामध्ये बऱ्याच लोकांना केसामध्ये कोंडा आणि डोक्यात खाज येण्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते.

अनेकदा बरेच वेगवेगळे उपचार उपाय करूनसुद्धा त्यातून आपल्या हवे तसे समाधान किव्हा हवा तसा फायदा मिळत नाही. या समस्यांवर उपाय सांगतांना अनेक तज्ज्ञ आपल्याला काही उपाय सुचवतात. चला तर मंग ते कोणते आहेत ते जाणून घेऊया…

१) आहारात प्रथिने व पाण्याचे सेवन वाढवा – हिवाळ्यामध्ये आपल्या बऱ्याचवेळा कमी प्रमाणात तहान लागत असते आणि त्यामुळे आपण पाण्याचे सेवन कमी करतो. त्याचाच परिणाम म्हणजे आपली डोक्याची त्वचा ही कोरडी पडते व केसात कोंडा होतो. प्रथिने युक्त पदार्थ सेवन केल्याने केसांना बळकटी मिळण्यासोबतच केसातला कोंडा कमी होण्यासही मदत होईल.

२) ताणतणावाचे प्रमाण कमी करा : तणावाचा केस विकारांवर प्रत्यक्ष परिणाम जरी होत नसला तरी अप्रत्यक्षपणे केसांचे विकार वाढविण्यासाठी तणाव कारणीभूत ठरत असतो. त्यामुळे तणावमुक्त जीवन जगण्यावर भर द्या.

३) केस नियमित धुवा : प्रदूषण अथवा वातावरणा बदल झाल्यामुळे केसांवर जमा झालेले दूषित कण हे केस नियमित धुतल्यामुळे स्वछ होतील. परंतु या मध्ये एका गोष्टीची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे; ती म्हणजे केस धुण्यासाठी केमिकलयुक्त शॅम्पू वापरणे टाळा.

सतत शॅम्पू वापरल्याने केस शुष्क आणि कोरडे पडतात. शक्यतो हानिकारक केमिकल रहित कंडिशनरचा वापर करा. कंडिश्नरमुळे केसातला ओलावा टिकून राहण्यास मदत होईल.

Team Hou De Viral