सावत्र असूनही ते सख्ख्या भावंडां सारखे राहतात हे बॉलिवूडचे स्टार्स, नंबर 3 वर विश्वासच नाही बसणार !

सावत्र असूनही ते सख्ख्या भावंडां सारखे राहतात हे बॉलिवूडचे स्टार्स, नंबर 3 वर विश्वासच नाही बसणार !

मित्रांनो, अलीकडे बॉलिवूडच्या अनेक स्टार्सने रक्षाबंधन उत्सव साजरा केला. पण आपणास हे कदाचित ठाऊक नाही की बॉलिवूडमध्ये असे अनेक तारे आहेत जे सख्खे भाऊ-बहिणी नसतानाही एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि नेहमी एकत्र असतात.आजच्या पोस्टमध्ये आम्ही बॉलिवूडमधील काही सावत्र भावंडांबद्दल सविस्तर सांगणार आहोत.

अर्जुन कपूर आणि जाह्नवी कपूर

अर्जुन कपूर बोनी कपूरची पहिली पत्नी मोनाचा मुलगा आहे. तसेच मुलगी अंशुला कपूर आहे. याशिवाय त्यांना श्रीदेवी कडून दोन मुली जाह्नवी आणि खुशी आहेत.सुरुवातीला अर्जुन आणि जाह्नवी आणि खुशी यांचे नाते चांगले नव्हते पण श्रीदेवीच्या निधनानंतर हे सर्व भावंडे खूप जवळ आले आणि आता एकत्र राहतात.

सारा अली खान आणि तैमूर अली खान

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी आहे. तसेच तैमूर हा सैफची दुसरी पत्नी करीना कपूरचा मुलगा आहे. सारा आणि तैमूरचे खूप चांगले संबंध आहेत.गेल्या वर्षी तैमूरला त्याची सावत्र बहीण सारा अली खानने राखी बांधली होती. दोघांचेही फोटो बर्‍याचदा इंटरनेटवर व्हायरल होतात.

शाहिद कपूर आणि ईशान खट्टर

बॉलिवूड अभिनेता शाहिद आणि ईशान हे सावत्र भाऊ आहेत. पंकज कपूर आणि नीलिमा अजीमचा मुलगा शाहिद आहे.तर राजेश खट्टर आणि नीलिमा यांचा मुलगा इशान खट्टर आहे.पण सावत्र भाऊ असूनही दोघांचेही खूप प्रेम आहे. अलीकडेच हे दोन्ही भाऊ एकत्र परदेशात सुट्टी घालताना दिसले.

पूजा भट्ट आणि आलिया भट्ट

पूजा भट्ट महेश भट्टची पहिली पत्नी किरण भट्ट यांची मुलगी आहे, तर आलिया आणि शाहीनचे ह्या महेश भट्ट यांची दुसरी पत्नी सोनी राजदान यांच्या मुली आहेत. आलिया आणि पूजामध्ये बऱ्याच बॉन्डिंग पाहायला मिळते.सध्या ह्या दोघी त्यांचे वडील महेश भट्टने बनवलेल्या सडक 2 मध्ये एकत्र दिसणार आहेत.

आझाद आणि जुनैद खान

आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्तला इरा आणि जुनैद ही दोन मुलं आहेत. आझाद त्यांची दुसरी पत्नी किरण राव यांचा मुलगा आहे. इरा आणि आझाद अनेक वेळा एकत्र दिसले आहेत.जुनेद आणि त्याच्या वडिलांसोबत आझादसुद्धा दिसला आहे, दोघेही एकमेकांसोबत बर्‍यापैकी आनंदी दिसत आहेत.

Team Hou De Viral