सिंधू नाही तर या लोकप्रिय अभिनेत्रीच्या प्रेमात आहे राघव लवकरचं ‘लग्नबंधनात’

स्टार प्रवाह या वाहिनीवर सध्या लग्नाची बेडी ही मालिका प्रचंड गाजत आहे. या मालिकेमध्ये आपल्याला अनेक भूमिका दिसल्या आहेत. मात्र, या मालिकेतील सिंधू आणि राघव यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे. या मालिकेमध्ये सिंधूची भूमिका अभिनेत्री सायली देवधर हिने साकारली आहे.
ही अतिशय चांगली अशी अभिनेत्री आहे, तर राघवची भूमिका अभिनेता संकेत पाठक याने साकारली आहे. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांची प्रचंड प्रसिद्धी मिळत आहे. खऱ्या आयुष्यात देखील या दोघांनीच लग्न करावे, असे देखील असे प्रेक्षक म्हणत आहेत. मात्र, खऱ्या आयुष्यामध्ये चित्र काही वेगळं आहे. सायली देवधर हिने काही वर्षांपूर्वीच लग्न केले आहे.
सायली देवधर ही सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्याशी वेगवेगळ्या प्रकारचे संवाद देखील साधत असते आणि आपले फोटो देखील शेअर करत असते. तर संकेत पाठक हा देखील आपले अनेक फोटो हा शेअर करत असतो. त्याच्या फोटोला अनेक जण लाईक देखील करत असतात.
संकेत पाठक हा आपल्याला काही मालिका आणि चित्रपटातही दिसला आहे, तर त्याने मॉडलिंगमध्ये देखील आपले नशीब आजमावले आहे. आता संकेत पाठक चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्याने सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तो अभिनेत्री सुपर्णा श्यामसोबत दिसत आहे. सुपर्णा श्याम त्याची प्रेयसी आहे.
डिसेंबर महिन्यात या दोघांनी साखरपुडा केला आहे, हे दोघेही लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या पोस्टमध्ये तो त्याची प्रेयसी सुपर्णा शाम सोबत दिसत आहे, तर आपल्याला अभिनेता संकेत पाठक आवडतो का? त्याने काम केलेली कुठली भूमिका आवडते, हे नक्की सांगा.