हा आहे राधिकाच्या आयुष्यातला खरा जोडीदार, लग्नाआधीच पार्टनरसोबत राहायची लिव्ह इनमध्ये

हा आहे राधिकाच्या आयुष्यातला खरा जोडीदार, लग्नाआधीच पार्टनरसोबत राहायची लिव्ह इनमध्ये

तिचा अस्सल नागपूरी तडका आणि उत्तम अभिनयाने ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधल्या राधिकाने अर्थात अनिता दाते ने प्रेक्षकांच्या मनामनात घर केले आहे. या मालिकेमध्ये राधिका ही नवऱ्याच्या कुरापतींनी कंटाळलेली दाखवलेली आहे.

खऱ्या आयुष्यात अनिता दाते केळकर म्हणजेच आपली राधिका मात्र लै बिनधास्त स्वभावाची आहे. आणि यात अनिताची ख-या आयुष्यात लव्हस्टोरी एकदम भन्नाट आहे.अनिताचे लग्न झालेले आहे. आणि तिच्या नवऱ्याचे नाव चिन्मय केळकर असून चिन्मय हा देखील याच क्षेत्राशी संबंधित आहे.

राधिकाचा नवरा हा बऱ्याच वर्षांपासून अनुराग कश्यपसोबत काम करत आहे आणि तो एक उत्तम लेखक आहे. अनिता व चिन्मय या दोघांची ओळख ललित केंद्रात असतानाच ओळख झाली होती. पण त्यावेळी ते दोघे केवळ मित्र होते. पण एका नाटकाच्या दरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

सिगारेट्स नावाच्या नाटकाच्या तालमीच्या वेळी ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले असल्याची त्यांना जाणीव झाली. पण चिन्मयला लग्न करायचे नव्हते आणि त्याने ही गोष्ट स्पष्टपणे अनिताला सांगितली होती. त्यामुळे त्या दोघांनी लिव्ह इन मध्ये राहायला सुरुवात केली.

हे दोघे दीड वर्षं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. त्यानंतर त्या दोघांनी लग्नाचं ठरवल. आता त्या दोघांच्या लग्नाला अकरा वर्षांहून अधिक काळ झालेला आहे.अनिताने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात खूप छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत.

एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत स्पृहा जोशीच्या मैत्रिणीच्या भूमिकेत ती दिसली होती. या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्यानंतर ती ‘हलकं फुलकं’ या नाटकात सागर कारंडेसोबत झळकली होती.

एवढेच नव्हे तर राणी मुखर्जीच्या ‘अय्या’ या चित्रपटात देखील तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील भूमिकेमुळे तिच्या संपूर्ण करियरला कलाटणी मिळाली असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही.

Team Hou De Viral