‘हिंदी बिगबॉस’ वर प्रेक्षक भडकले ! इतरांच्या चुकीची शिक्षा ‘शिव ठाकरे’ ला

‘हिंदी बिगबॉस’ वर प्रेक्षक भडकले ! इतरांच्या चुकीची शिक्षा ‘शिव ठाकरे’ ला

हिंदीमध्ये सुरू असलेला बिग बॉस 16 हा शो सध्या चांगला चर्चेत आला आहे. या शोमध्ये अनेक स्पर्धक हे सहभागी झाले आहेत. मात्र या शोमध्ये सहभागी झालेला मराठमोळा शिव ठाकरे हा चांगला चर्चेत आला आहे. शिव ठाकरे याला सध्या इतरांच्या चुकीची शिक्षा भोगावी लागत आहे. याबद्दलच आम्ही आपल्याला या लेखामध्ये माहिती देणार आहोत.

शिव ठाकरे काही दिवसापूर्वी चांगलाच चर्चेत आला आहे. नुकताच त्याचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे. शिव सध्या चक्क बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री मलायका अरोरासोबत झळकला होता. या दोघांना एकत्र पाहून मराठी सिनेसृष्टीत चांगलीच चर्चा रंगली होती. या दोघांचाही खास रोमँटिक अंदाज प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.

मलायका तिच्या चाहत्यासाठी खास फोटो शेअर करत असते. शिव हा द मॅन या टीव्ही रिॲलिटी शोमधून पुढे आलेला आहे. शिव ठाकरेसोबत मलायका ही थिरकताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी शिवने मलायकासोबत स्पेशल रिव शेअर केला होती. ही रूल चाहत्यांना भरपूर आवडली होती. आता या दोघांनी एक रोमँटिक रिल केली आहे.

शिव ठाकरेने हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा रिल सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मलायकाबाबत एक वेगळीच चर्चा रंगली आहे. मराठी सिनेसृष्टीत मलायका पदार्पण करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र मला काही कुठल्या चित्रपटात किंवा मालिकेतून पदार्पण करता काही याबाबत अजून माहिती मिळाली नाही.

बिग बॉसच्या घरातून आता एक बातमी समोर आली आहे. बिग बॉसने शिव ठाकरे याला कॅप्टन केले होते. कॅप्टन केल्यानंतर त्याच्या टीम मधील सदस्यांनी त्याचे ऐकणे अपेक्षित होते. मात्र, आता त्याचे कोणीच ऐकत नाही. त्याचे सगळेजण खिल्ली उडवतात.

मस्करी करतात असे चित्र बिग बॉसच्या हिंदी शो मध्ये दिसत आहे, तर शिव ठाकरे याचे कोणीच ऐकत नसल्यामुळे बिग बॉसने त्याला आदेश दिला की, जो कोणी तुझे ऐकत नाही, त्याला तू बॉक्समध्ये बंद करून ठेव. मात्र, शिव ठाकरे याने आवाहन केल्यानंतरही त्याची सर्वजण मस्करी करत असल्याचे समोर आले आणि त्याची खिल्ली उडवत असल्याचे समोर आले आहे.

त्यानंतर बिग बॉसने शिव ठाकरे यांची कॅप्टनसी काढून घेतली आहे. त्यामुळे इतरांच्या चुकीची शिक्षा शिव ठाकरे याला भोगावी लागली, अशीच चर्चा सध्या रंगली आहे.

Team Hou De Viral