हिवाळ्यात दही खाणे आरोग्यास घातक आहे की नाही ?

बर्याच लोकांना दही खायला आवडत. रायता असो किंवा लस्सी त्याला प्रत्येक प्रकारे खाऊ शकतो. तसेच दही खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे होतात. पण लोक हिवाळ्याच्या हंगामात दही खाण्याविषयी अनेकदा माघे सरकतात.
काहींना असे वाटते की दही आपल्याला हानी पोहचवेल तर काही असे म्हणतात की अस काही नाही. तर आपण जाणून घेऊया आयुर्वेदानुसार हिवाळ्यात दही खाणे आरोग्यासाठी योग्य आहे की नाही.
आयुर्वेद तज्ज्ञांच्या मते हिवाळ्यात दही खाल्ल्याने शरीरात कफ वाढतो. कारण दही खाल्ल्याने घशात श्लेष्मा तयार होतो आणि सर्दी व खोकल्याची समस्या वाढते. तसेच, ज्यांची रोग प्रतिकारशक्ती कमकुवत आहे किंवा दमा किंवा साइनसच्या समस्येने ग्रस्त आहेत त्यांनी आयुर्वेदानुसार विशेषत: रात्री दहीचे सेवन करू नये.
परंतु दहीमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन बी 12 आणि फॉस्फरस सारखे अनेक पोषक घटक असतात. ज्याच्या मदतीने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. दही खाल्ल्याने आतड्यात निरोगी जीवाणू पोहोचतात जे अन्न पचण्यास मदत करतात. म्हणून हिवाळ्यात दही खाणेही फायदेशीर ठरते. तथापि, ज्यांना श्वसन रोग आहेत त्यांनी संध्याकाळी 5 नंतर दही खाणे टाळावे.
तसेच, हिवाळ्यात काही पालेभाज्या असतात ज्यांचे रायता खूप चवदार असतात. पण दही खाण्याबद्दल प्रत्येकजण वेगवेगळे मत देतो. जर आपल्याला हिवाळ्यात दही खाण्याची इच्छा असेल आणि सर्दी खोकला नको असेल तर सर्वोत्तम दहीचे तापमान हे घरच्या एवढं असावे.
खूप थंड दही खाऊ नका. तसेच, शक्य असल्यास ताजे दही खा. जर तुम्ही दही खाण्यामध्ये ही खबरदारी घेतली तर हिवाळ्यातही दही फायद्याचे आहे.