हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची आहे का ? तर खायला हवा चिकू

हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची आहे का ? तर खायला हवा चिकू

चिकूच्या गुणधर्म जरी थंड असला तरीसुद्धा हिवाळा आणि उन्हाळ्यात चिकू हे फळ आवडीनं खाल्ल जात. काही लोक चिकूचा ज्यूस, चिकूची बर्फी किंवा सुका चिकू मेवा म्हणून सुद्धा खातात. चिकूपासून कोशिंबीरही केली जाते.

आपल्या शरीराला चिकूपासून व्हिटॅमिन ए आणि सी मिळते. आणि तर आपल्या शरीरात अॅन्टिबॅक्टेरियल म्हणून कार्य करते. हिवाळ्यामध्ये चिकू आपल्या शरीराला बऱ्याच आजारांपासून दूर ठेवतं. तर चला जाणून घेऊया चिकू खाण्याचे शरीराला कोणतं फायदे आहेत.

थकलेल्या, दमलेल्या, अशक्त असलेल्या तसेच निरुत्साही असलेल्या व्यक्तींनी रोज एक चिकू खाणं आवश्यक आहे.

चिकूमध्ये असणारे कॅल्शियम व फॉस्फरस हे आपल्या शरीरातील लोहाचं प्रमाण हे संतुलित ठेवण्याचे कार्य करते. आणि त्याचमुळे हाडांना बळकटी मिळते. डोळ्यांसाठी चिकू खाणं एकदम फायदेशीर आहे. चिकूने आपली दृष्टी चांगली होते. यासोबत चिकूमध्ये असणारे पोषक तत्व शरीराला वेगवेगळ्या इन्फेक्शन होण्यापासून दूर ठेवतात.

जर तुम्हालासुद्धा गॅस किव्हा अपचनाची समस्या असेल तर चिकू या फळाचे सेवन जरूर करा. यामध्ये पित्तनाशक गुणधर्म असल्यामुळे जेवणा झाल्यावर चिकु खा. त्याचबरोबर चिकू आपले हृदयासंबंधी आजारापासून संरक्षण करते. कफ व श्वासनासंबंधी आजार दूर करण्यासाठी चिकू फायदेशीर ठरतो. सर्दी झाली असेल तरी हे फळ खाणे उपयुक्त ठरते. चिकूतील ई व्हिटॅमिनमुळे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत मिळते.

चिकू खाल्ल्यामुळे लहान मुलांना ताकद मिळतेच तसेच मानसिक ताण देखील कमी होतो. याशिवाय मुलांना झोपही शांत लागते. ज्या लोकांना अशक्तपणा आहे अशांनी तर केळ चिकू सारखे फळे खाणं गरजेचं आहे. ताप आलेल्या रुग्णांच्या तोंडाला जर चव नसेल तर त्यांना चिकू खावा. त्याने तोंडास रुची निर्माण होऊन उत्साह निर्माण होतो.

काहीवेळा तिखट पदार्थ खाल्ल्याने छातीत आणि पोटात जळजळल्यासारखे होते. मात्र त्यावर आराम मिळवायचा असेल तर चिकू अतिशय उपयुक्त ठरतो. सुक्यामेव्या सोबत म्हणजेच ड्राय़फ्रूटसोबत सुकवलेला चिकू रोज सकाळी खाल्ला तरीही शरीराला फायदा होतो.

शक्यतो चिकूचा मिल्कशेक घेण्यापेक्षा नुसतं फळ म्हणून चिकू खाल्ला तर त्यापासून शरीराला मिळणारे व्हिटॅमिन्स आणि होणारे फायदे अधिक आहेत. हिवाळ्यात चिकूचा आहारात समावेश केला तर पोटाच्या विकारांपासून सुटका मिळू शकते. यासोबतच शरीरातील इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत होते.

Team Hou De Viral