2 फेब्रुवारी तुळ: आर्थिक तडजोडीची आवश्यकता भासेल

2 फेब्रुवारी तुळ: आर्थिक तडजोडीची आवश्यकता भासेल

मेष: विवाहविषयक बोलणी सफल होतील. मागील काळात केलेल्या योजनांमध्ये समाधानकारक यश लाभेल. धार्मिक सहलीला जाण्याचे योग येतील.

वृषभ: जिवलग मित्र नाराज होईल. बड्या उद्योजकांनी केलेल्या आर्थिक गुंतवणुकीतून तोटा संभवतो. वायफळ चर्चा करणे टाळावे.

मिथुन: व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी कानावर येईल. एकांत हवाहवासा वाटेल. आर्थिक आवक वाढेल.

कर्क: संततीच्या सहवासात चिंतांचा विसर पडेल. नोकरीत कामे वेळेवर पूर्ण झाल्याने खूष असाल. प्रिय व्यक्तीच्या अनुपस्थितीमुळे मन विचलित होईल.

सिंह: नोकरदार व्यक्तींनी कामाची पद्धत अवश्य बदलावी. गृहिणींनी घरातील अव्यवस्थितपणा टाळावा. योगाचे धडे गिरवाल.

कन्या: अनावश्यक कामांचा बोजा पडणार नाही, याची काळजी घ्या. रिकामा वेळ गरजूला मदत करून सत्कारणी लावा. वसतिगृहातील विद्यार्थी आज घरच्यांना भेटू शकतील.

तुळ: आर्थिक तडजोडीची आवश्यकता भासेल. नवीन व्यावसायिक तंत्रज्ञान शिकण्यात अग्रेसर राहाल. सभोवतालच्या लोकांकडून दुर्लक्ष केले जाईल.

वृश्चिक: आज लहानात लहान होऊन वागाल. आनंदात राहाल. दिवसाच्या उत्तरार्धात रंगाचा बेरंग होण्याची शक्यता.

धनु: विद्यार्थ्यांना अभ्यास सहलीचा अनुभव घेता येईल. ज्ञानात भर पडेल. प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाचे फळ म्हणून आज धनलाभ होईल.

मकर: तुमच्या मताला महत्त्व प्राप्त होईल. भावनाप्रधान व्हाल. समाजात वावरताना आदरणीय व्यक्ती भेटतील.

कुंभ: गुंतवणूक करताना सद्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवा. आळसावलेला दिवस. पत्नीकडून सुग्रास भोजनाचा बेत आखला जाईल.

मीन: उधार देताना आवश्यक त्या कागदपत्रांवर नोंद करून मगच व्यवहार करा. प्रिय व्यक्तींशी आज वाद होण्याची शक्यता. संततीचा सहवास लाभेल

Team Hou De Viral