जॉन सीना च्या लाइफ मध्ये नव्या प्रेमाची एन्ट्री, कॅनडामध्ये दिसला मिस्ट्री गर्ल सोबत रोमांटिक डेटवर !

जॉन सीना च्या लाइफ मध्ये नव्या प्रेमाची एन्ट्री, कॅनडामध्ये दिसला मिस्ट्री गर्ल सोबत रोमांटिक डेटवर !

लोकप्रिय अमेरिकन अभिनेता-पैलवान जॉन सीना आणि निक्की बेला यांच्या ब्रेकअपने डब्ल्यूडब्ल्यूई युनिव्हर्सच्या अनेक चाहत्यांना आश्चर्य वाटले.

जॉन आणि निक्कीचे अफेअर 6 वर्षे चालले. ते अगदी एकमेकांत गुंतले होते. ब्रेकअपनंतर निक्की बेला आयुष्यात पुढे गेली आहे. आता बातमी आहे की जॉन सीनाच्या आयुष्यात या दिवसात नव्या प्रेमाची इन्ट्री झाली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार जॉन सीनाला मिस्ट्री गर्लबरोबर कॅनडामध्ये स्पॉट केले होते. आजकाल जॉन व्हँकुव्हरमध्ये हॉलिवूड प्रोजेक्ट “प्लेइंग विथ फायर” च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सुट्टीच्या दिवशी जॉन सीना आणि मिस्ट्री गर्ल 4 तासांच्या रोमँटिक डेटवर गेले.

रात्रीच्या जेवणानंतर जॉन व्हॅनकुव्हरच्या रस्त्यावर मिस्ट्री गर्लसोबत रोमँटिक स्टाईलमध्ये दिसला. दोघांच्याही केमिस्ट्रीवरून हे स्पष्ट झाले होते की ते दोघे प्रेमात आहेत.

मात्र, जॉन सीनाच्या मिस्त्री गर्लविषयी फारशी माहिती समोर आली नाही.

गेल्या वर्षी ब्रेकअपच्या वृत्ताला दुजोरा देत जॉन-निक्की यांनी एक संयुक्त विधान जारी केले.

ज्यामध्ये असे लिहिले होते की – “हे ठरवणे फार कठीण होते. विभक्त झाल्यानंतरही आम्ही एकमेकांना प्रेम करू आणि आदर देऊ. कृपया आयुष्याच्या या कठीण टप्प्यावर आमच्या गोपनीयतेचा आदर करा.

2012 मध्ये जॉन आणि निक्कीच्या नात्याची सुरुवात झाली. ते 2017 मध्ये त्यांचा सारखापुडा देखील झाला होता. 5 मे 2018 रोजी जॉन-निक्कीचे लग्न होणार होते. पण लग्नाच्या 20 दिवस आधी ते वेगळे झाले.

रिलेशनशिपच्या दिवसांमध्ये जॉन आणि निक्कीची केमिस्ट्रीही WWE च्या रिंगमध्ये दिसली. जॉन सीनाने निक्कीला रेसलमेनिया 33 च्या स्टेजवर प्रपोज केले.

Team Hou De Viral