भारतीय क्रिकेटविश्व हादरलं ! २५ वर्षीय क्रिकेटपटूचे अपघातात दुःखद निधन

भारतीय क्रिकेटविश्व हादरलं ! २५ वर्षीय क्रिकेटपटूचे अपघातात दुःखद निधन

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीचे अवयव हे दुसऱ्याचा कुणाचा जीव वाचवू शकतात. मात्र, समाजामध्ये याबाबत फारशी सजता अजूनही नाही. 99% लोक हे एखाद्या आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा अंत्यविधी उरकून टाकतात.

मात्र, काही लोक हे आपले अवयव दान करण्याचा निर्णय घेतात आणि यामुळे इतरांना नवीन आयुष्य मिळतं. असाच उपयोग भविष्यामध्ये करावा, असे देखील अनेक जण सांगताना दिसतात. आता देखील एका क्रिकेटपटूचे बाबतीत असाच अपघात झाल्यानंतर त्याचे अवयव काढून दुसऱ्यांना देण्यात आले. यामुळे आठ जणांना अवयव मिळाले आणि त्यांनी नवीन आयुष्य सुरू केले आहे.

25 वर्षीय अनमोल जैन याचा अपघातामध्ये मृत्यू झाला होता. ब्रेनडेड त्याला घोषित करण्यात आले होते. त्यानंतर त्याचे अवयव इतरांना देण्याचा निर्णय त्याच्या कुटुंबीयांनी घेतला होता आणि काही जणांच्या जीवनातील अंधकार यामुळे दूर झाला. अनमोलचे हृदय, यकृत, दोन मूत्रपिंड, डोळे आणि त्वचा सोमवारी भोपाळ, इंदूर आणि अहमदाबादमधील गरजू रुग्णांना दान करण्यात आली.

अनमोल हा उदयोन्मुख क्रिकेटर होता. डीबी मॉलमधील एका कंपनीत काम करत होता. या माध्यमातून त्याला खूप मोठे अर्थार्जण देखील होत होते त्याचा कुटुंबाचा गाडा देखील यातून चालत होता.१७ नोव्हेंबर रोजी अनमोलचा अपघात झाला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. सकाळी ९ ते ११ या वेळेत अनमोलचे हृदय, यकृत आणि किडनी काढण्यात आले.

त्यानंतर त्याच्या अवयव हे गुजरात येथे पाठवण्यात आले. यासाठी विशेष असा ग्रीन कॉरिडोर देखील करण्यात आले. ग्रीन कॉरिडॉर मध्ये आपल्याला अतिशय वेगवान व्यवस्था पाहायला मिळते. एकूणच अनमोल याने व त्याच्या कुटुंबीयांनी हा निर्णय घेतल्यामुळे आठ जणांना नवीन आयुष्य पाहायला मिळाले.

Team Hou De Viral