बाबोव ! एकाच वेळी ४ बॉयफ्रेंडसोबत मुलीचं सुरू होतं अफेअर; बापाला समजताच बापाने केले असे काही

बाबोव ! एकाच वेळी ४ बॉयफ्रेंडसोबत मुलीचं सुरू होतं अफेअर; बापाला समजताच बापाने केले असे काही

गुजरातच्या अहमदाबाद येथे अजब प्रकार घडला आहे, २० वर्षाच्या मुलीच्या वडिलांना मुलाकडून काही मेसेज, फोन रेकॉर्डिंग आणि चॅटिंगचे स्क्रीनशॉट्स मिळाले, यावरून आपल्या मुलीचे एकाचवेळी ४ मुलांसोबत अफेअर सुरू असल्याची माहिती वडिलांना मिळाली, ज्या मुलाने मुलीच्या वडिलांना हे सगळं पाठवलं तोदेखील या ४ बॉयफ्रेंडपैकी एक असल्याचं समजलं आहे.

मुलीचे हे कारनामे ऐकून बापाला धक्काच बसला, याबद्दल बापाने कधीही कोणासमोर उल्लेख केला नाही, कारण मुलीच्या भविष्याची चिंता बापाला लागली होती, यातच मुलगी घर सोडून जाईल या भीतीने वडील मुलीलाही काही बोलले नाही. या सर्व गोष्टीवर विचार करून बापाने अखेर पोलीस मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतला.

महिलांसाठी अभयम् नावाने चालणाऱ्या पोलीस मार्गदर्शन केंद्राचा हेल्पलाईन नंबर १८१ आहे, वडिलांनी या नंबरवर संपर्क साधून त्यांची चिंता सांगितली, अभयम् टीम त्यांच्या घरी पोहचली तेव्हा मुलीने पहिल्यांदा त्यांच्याशी बोलण्यास नकार दिला.

त्यानंतर मुलीला तिचे मुलांसोबत असलेल्या संबंधांचे रेकॉर्ड वडिलांकडून दाखवण्यात आले, तेव्हा मुलीने ती ४ मुलांसोबत अफेअरमध्ये असल्याचं मान्य केले. मार्गदर्शन टीमधील महिला अधिकाऱ्यांनी मुलीला विश्वासात घेऊन तिची समजूत काढण्यास सुरूवात केली, काऊंसलिंगवेळी एका बॉयफ्रेंडसोबतही मुलीचं बोलणं झालं.

तेव्हा तो मुलगा या मुलीसोबत अफेअरमध्ये असतानाही लग्न कुणा दुसऱ्या मुलीसोबत करणार असल्याचं समजलं, अभयम् टीमने समजूत काढल्यानंतर मुलीने सर्व मुलांचे नंबर, फोटो आणि सारे रेकॉर्ड डिलीट करण्यास तयार झाली.

मुलीला समजवल्यानंतर आता अभयम् टीमने वडिलांनाही मार्गदर्शन केले, आता यापुढे चुकूनही मुलीसमोर या गोष्टींचा उल्लेख करू नका, आणि तिला ओरडू नका, वडिलांनीही मुलीसोबत काही न घडल्यासारखंच वागेन असं आश्वासन दिलं.

अहमदाबादमध्ये अभयम् १८१ महिला हेल्पलाईन ही महिलांच्या कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी सज्ज असते, अनेकदा महिला अत्याचार होत असतानाही तक्रार करण्याची हिंमत दाखवत नाही, अशा महिला या हेल्पलाईनवर संपर्क साधून त्यांच्या समस्यांवर तोडगा काढतात.

Team Hou De Viral