90 च्या दशकातील या अभिनेत्र्या आता दिसतात काही अश्या, बघा अगोदरचा आणि आत्ताचा लुक

90 च्या दशकातील या अभिनेत्र्या आता दिसतात काही अश्या, बघा अगोदरचा आणि आत्ताचा लुक

90 च्या दशकात एक-दोन नव्हे तर बऱ्याच फॅमिली ड्रामा असणाऱ्या सीरियल होत्या. यामध्ये कसौटी जिंदगी की, कहानी घर घर की, सास भी कभी बहु थी, कसम से, कभी सौतन कभी सहेली अशा टीव्ही शोचा समावेश आहे. या टीव्ही मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत असलेल्या अभिनेत्रींना बरीच लोकप्रियता मिळाली.

इतकेच नव्हे तर संस्कारी सून बनून त्यांनी प्रेक्षकांच्या हृदयात स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली. तसे जर पाहायला गेले तर आजही जवळजवळ प्रत्येकाच्या या अभिनत्र्या आवडत्या आहेत. बऱ्याच कालावधी नंतर आता या सुनांमध्ये बराच बदल झाला आहे. चला तर मग पाहूया या हिट अभिनेत्रींचे पहिले आणि आताचे रूप.

1. स्मृती इराणी

सास भी कभी बहु थी या एकता कपूरच्या हिट शोमध्ये काम करणार्‍या स्मृती इराणीने आपली जबरदस्त ओळख बनवली आहे. या मालिकेमध्ये तिने आदर्शवादी सून तुलसीची भूमिका साकारली होती आणि तेव्हापासून लोकांच्या मनात आजही तिची जुनी प्रतिमा जिवंत आहे. पण आता त्यांनी अभिनयाला निरोप दिला आहे. सध्या स्मृती इराणी केंद्रीय मंत्री आहेत.

2. श्वेता तिवारी

टीव्ही सीरियल कसौटी जिंदगी की मध्ये प्रेरणाची भूमिका श्वेता तिवारी या अभिनेत्रीने साकारली होती. या शोने श्वेता तिवारीच्या कारकिर्दीला जणू काही उड्डाणच दिले. आता श्वेता तिवारी पूर्वीपेक्षा फॅशनेबल झाली आहे.

3.अनिता हसनंदानी

टीव्ही जगातील सर्वात ग्लॅमरस आणि स्टाइलिश अभिनेत्रींच्या यादीत अनिता हसनंदानी अजूनही आहे. पण अनिताने यापूर्वी टीव्ही सीरियल कभी सौतन कभी सहेली मध्ये तनुची भूमिका देखील साकारली आहे. मागील दिवसांमध्ये अनिता नागिन 3 मध्ये विशाखाच्या भूमिकेत दिसली आहे.

4.आमना शरीफ

टीव्ही सीरियल ‘कह तो होगा’ या मालिकेत कशिशची भूमिका साकारणारी अभिनेत्री आमना शरीफ हिने बराच फॅशन ट्रेंड सेट केले होते. त्यानंतरही आमना आपल्या लूकमुळे चर्चेत राहत असे आणि आजही तिचा जबरदस्त लुक सोशल मीडियावर समोर आला आहे.

5. साक्षी तंवर

साक्षी तंवर यांनी प्रसिद्ध टीव्ही सीरियल कहानी घर घर की मध्ये पार्वतीची भूमिका साकारून तिच्या चाहत्यांच्या मनात एक खास ओळख निर्माण केली होती. साक्षीचे लूक वर्षानुवर्षे बरेच बदलले आहे. साक्षीने सूनेची छाप टाकून सिनेमांमध्येही काम केले आहे.

6. नौशीन अली

‘कुसुम’ या मालिकेतून आपल्या मोहक व्यक्तिमत्त्वातून लोकांची मने जिंकणारी अभिनेत्री नौशीन अली सरदार काळानुसार आणखीनच बदलली आहे. कुसुम मधली दिसणारी साधी सून अजून ग्लॅमरस बनली आहे.

7. उर्वशी ढोलकिया

कसौटी जिंदगी की या मालिकेत कोमोलिका भूमिका साकारून प्रसिद्ध झालेली उर्वशी ढोलकिया कोणास ठाऊक ही नसेल. कोमोलिका तिच्या तेवर आणि या व्यतिरिक्त उर्वशीचा ड्रेस अप नेहमीच चर्चेत असतो. वर्षानुवर्षे उर्वशी पूर्वीपेक्षा अधिक स्टायलिश झाली आहे.

8.प्राची देसाई

‘कसम’ या मालिकेत चुलबुल दिसणाऱ्या प्राची देसाईच्या लूकमध्ये बराच बदल झाला आहे.असे म्हणतात की प्राचीने ओठांची शस्त्रक्रिया केली. विशेष म्हणजे शस्त्रक्रिया तिच्यासाठी योग्य असल्याचे सिद्ध झाले. प्राची आता पूर्वीपेक्षा सुंदर आहे.

Team Hou De Viral