‘कॅमेरा बघतोय, लाज बाळगा’, बॅगेवरून बिगबॉस च्या घरात तुफान राडा

‘कॅमेरा बघतोय, लाज बाळगा’, बॅगेवरून बिगबॉस च्या घरात तुफान राडा

कलर्स मराठी या वाहिनीवर दोन ऑक्टोबर पासून मराठी बिग बॉस सुरू झाला आहे. या शोचे हे चौथे सत्र आहे. चौथ्या सत्रामध्ये आपल्याला अनेक कलाकार हे सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहेत.

किरण माने, अमृता देशमुख, समृद्धी जाधव, प्रसाद जवादे, निखिल राज शिर्के, तेजस्विनी लोणारे, विकास पाटील यांच्यासह इतर कलाकार या शोमध्ये सहभागी झाले आहेत. या शोमध्ये गेल्या चार-पाच दिवसापासून प्रचंड भांडण होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. बिग बॉस सुरू होऊन आता जवळपास सात ते आठ दिवस झालेले आहेत.

मात्र, या शोमध्ये अजून लयबद्धता येण्यास बाकी आहे. हा शो टीआरपीच्या बाबतीत देखील थोडा मागेच असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा शो आता किती काळ टिकतो, हे देखील पाहणे फार महत्त्वाचे आहे. बिग बॉस या शोमध्ये आपल्याला या वेळेस किरण माने यांच्यासारखा दिग्गज कलाकार सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

किरण माने यांनी याआधी अनेक मालिका आणि चित्रपटातही काम केले आहे. किरण माने हे अतिशय जबरदस्त असे अभिनेते आहेत. किरण माने यांनी मध्यंतरी मुलगी झाली हो ही मालिका सोडली होती. मुलगी झाली हो या मालिकेच्या सेटवर त्यांचा प्रचंड वाद झाला होता. हा वाद झाल्यानंतर त्यांनी या मालिकेच्या निर्मात्यांवर खूप आरोप लावले होते आणि आपल्या सोबत राजकारण झाले होते, असे त्यांनी म्हटले.

यासाठी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील भेट घेतली होती. आता ती बिग बॉसच्या घरामध्ये सहभागी झाली आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांनी अनेकांना पाठिंबा देण्याचे धोरण देखील पाहायला मिळत आहे. मध्यंतरी विकास पाटील यांना दुसऱ्या ग्रुपमधील सदस्य हे प्रचंड भांडत होते.

त्यानंतर त्यांनी विकास पाटील यांना धीर देऊन तू आता या सगळ्यांना चांगला धडा शिकव, असे म्हटले होते. त्यानंतर विकास पाटील हा आक्रमकपणे खेळ करत असल्याचे आपण पाहिले आहे. त्याचबरोबर अलीकडच्याच भागामध्ये अमृता देशमुख ही देखील किरण माने यांच्या खांद्यावर डोके ठेवून ढसाढसा रडली. तिला देखील किरण माने यांनी सपोर्ट केला.

आता बिग बॉस मध्ये नुकताच एक प्रचंड राडा झाल्याचे पाहायला मिळाले. याचे कारण मध्ये बिग बॉस मध्ये सगळ्यांना बॅगचे वाटप करण्यात आले. मात्र, या बॅग घेताना अनेक जण भांडण करत असल्याची पाहायला मिळाले. प्रसाद जवादे याला बॅग मिळाली नाही, तर सगळेजण बॅगांवर तुटून पडले आणि भांडण करायला लागले.

तेवढ्यातच किरण माने सगळ्यांना उद्देशून म्हणाले की, कॅमेरा बघतोय, कोणाची बॅग कुठे आहे, ते. त्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीने खेळा. त्यावर विकास पाटील देखील म्हणताना दिसत आहे की, मी माझी बॅग दुसऱ्याला का द्यावी? एकूणच काय तर बिग बॉसच्या घरामध्ये आता बॅग घेण्यावरून प्रचंड वादंग माजल्याचे दिसत आहे.

तर आपण मराठी बिग बॉस हा शो पाहतात का? या शोमधील सर्वाधिक सेलिब्रिटी कुठला आपल्याला आवडतो, आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral