‘सुंदरा मनामध्ये भरली’ मध्ये धक्कादायक वळण, दौलतला जेलची हवा…

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मध्ये धक्कादायक वळण, दौलतला जेलची हवा…

सुंदरा मनामध्ये भरली ही कलर्स मराठी वाहिनीवरील मालिका आहे. प्रेक्षक या मालिकेस चांगला प्रतिसाद देत आहेत. मालिकेत अभ्या आणि लतिकेच्या नात्यात पुन्हा एकदा वाद होऊ लागले आहे. हा वाद नंदिनीमुळे होताना दिसत आहे.

या मालिकेत नंदिनी आणि हेमा या दोघींची एन्ट्री झाल्याने प्रेक्षक मात्र भलतेच खूश झाले आहेत. सध्या आपण पहात आहोत की, गुढीपाडव्याचा सण जहागीरदार कुटुंबीय साजरा करणार आहेत.हा सण साजरा करताना हेमाला पाहून जाहगीरदार कुटुंबीय आश्चर्यचकित होतात.

सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत आपण सध्या पहात आहोत की दौलत हा फरार झाला आहे. अक्कासाहेब विचारता तू बरा आहेस ना रे पोरा, अभिमन्यु म्हणतो की, दौलत खरं आहे ते काही आवडले नाही मला. त्यावर लतिका म्हणते हे कोणालाच आवडलेले नाही. अभ्या म्हणतो की, मी सोडणार नाही त्याला.

लतिका कय म्हणते, जाऊ दे ना अभ्या, आपण कशाला कायदा हातात घ्यायचा. अर्धी लढाई आपण जिंकलो आहोत. पुढे लतिका म्हणते, आबाला अटक झाली आहे. अभ्या त्यांच्याकडे आता सत्ता आहे न पद आहे‌. आत बसून ते स्वत:ला सोडतील का मुलाला. आबा बडी असामी होते. आता दौलत ची सुटका होणार नाही.

त्यावर अभ्याचे वडील म्हणतात, तुमच्या आईसाहेबांना तुम्ही लहान तोंड करून बसलेले त्यांना आवडणार नाही. त्या असतं तर म्हटलं असतं लेकरा उठ बस झाला आता. यानंतर आता आक्कासाहेब लतिका व अभ्याचे औक्षण करतात. दोघांनाही आक्का साहेब खूप खूप सुखी रहा, असा आशिर्वाद देतात.

आक्कासाहेब अभ्याला पेढा खाऊ घालतात.परंतु याला अभ्या नकार देतो आणि म्हणतो की, जोपर्यंत दौलतला जेलची हवा खाऊ घालत नाही तोपर्यंत मी पेढा खाऊ शकत नाही. आक्कासाहेब म्हणतात बरं तसं. त्यावर आजी म्हणते उद्या गुढीपाडवा आहे. आमच्याकडे गुढीपाडवा नाही त्यावर अभ्याला आप्पा म्हणतात का बरं साजरा करायचा नाही.

आमच्या मिसेसला तर सण साजरी करायची हौस होती. यावर अभ्या म्हणतो म्हणूनच आप्पा… त्यावर आप्पा म्हणतात आम्ही वचन दिले त्यांना तुम्ही जसे असताना सर्व होत होते तसे आता होणार आणि आम्ही आमच्या मिसेसला दिलेले वचन मोडणार नाही. गुढीपाडवा होणार तो होणारच.

घरातील सर्वांचा मिळून एक विचार होतो आणि गुढीपाडवा करण्याचे ठरते.

Team Hou De Viral