‘या’ हाय व्होल्टेज ड्रामाने पालटली बाजी, ‘आई कुठे काय करते’ मालिका पुन्हा ठरली नं 1

‘या’ हाय व्होल्टेज ड्रामाने पालटली बाजी, ‘आई कुठे काय करते’ मालिका पुन्हा ठरली नं 1

‘आई कुठे काय करते’ ही मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरली आहे. या मालिकेच्या पहिल्या भागापासून प्रेक्षकांना ही मालिका प्रचंड आवडू लागली आहे. ही मालिका एका आईच्या अवती भोवती फिरणारे असे कथानक तयार करण्यात आले आहे.

आई आपले मुलं‌ व पतीसाठी कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी किती कष्ट घेऊ शकते, हे या अरुंधती नावाच्या भूमिकेतून दाखवण्यात आले आहे. आई स्वतःची स्वप्ने, आरोग्य, इच्छा, अपेक्षा या सर्व गोष्टी बाजूला सारून कुटुंबासाठी ती सातत्याने जगत असते. परंतु कुटुंबातील सदस्यांना तिच्या त्यागाची अस्तित्वाची जाणीवच होत नसते.

ती केवळ एक गृहिणी आहे, असे तिला गृहीत धरल्या जाते आणि यातूनच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यावर आधारित ही मालिका आहे. सध्या या मालिकेत अरुंधतीवर चारित्र्याचा आरोप असल्यामुळे कांचन आजी व अनिरुद्ध ला खडेबोल सुनावत अरुंधती देशमुख कुटुंबातून बाहेर पडली आहे. आहे त्या कपड्यांवर ती घराबाहेर पडते व पुन्हा या घरात कधीच येणार नाही, असे सांगते.

या गोष्टीसाठी तिला अप्पा, अविनाश, यश, इशा हे सर्वजण तिला मदत करतात. तर अरुंधतीचा मोठा मुलगा अभिषेक हा आपल्या वडिलांची बाजू घेतो. यामुळे अनघा, अभिषेकमध्ये जोरदार वाद होतो आणि अनघा म्हणते की, तुझ्या सोबत लग्न केल्याची मला लाज वाटू देऊ नको, अशी वर्तणूक ठेव, असे म्हणते.

तर आता दुसरीकडे संजना या गोष्टीचा फायदा घेऊन कांचन आजीच्या मनात अरुंधतीविषयी गैरसमज पसरवते. तसेच सांगते की आता लवकरच देशमुख घरावर असलेला हक्क आशुतोषला देईल. अशी कान भरणी करते. आजी संजनाचे ऐकते आणि तिच्याकडून तिथे असलेल्या घरावरचे हक्क ही वापस घेते. पेपर वर सह्या करताना अरुंधती वाचत नाही आणि त्यात काय आहे हे न वाचल्यामुळे ते घराचा हिस्सा आता संजनाच्या नावावर होईल

अरुंधतीने तिच्या स्वप्नांच्या आयुष्याला वास्तवात आणण्यासाठी सुरुवात केली आहे. ही अरुंधती आता सक्षम पणे स्वतःच्या पायावर उभी आहे. आशुतोषने तिला एक गाणे गाण्याची संधी दिली. हे गाणे तिचे खूप चांगले रेकॉर्ड होते. सगळीकडे तिचे कौतुक होत आहे. परंतु तिच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींना काही पूर्णविराम मिळत नाही.

नुकताच अनिरुद्धने अरुंधती तिच्या चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे तिने देशमुख कुटुंब यांचे घर तर सोडलेच आहे, घरावरील हक्क देखील सोडला आहे. आशुतोष तिला खंबीरपणे आता साथ देणार आहे. त्यांच्यातील मैत्री आणखी घट्ट होत असल्याचे दिसून येणार आहे. त्यामुळे हळूहळू का होईना आशुतोषच्या मनात अरुंधती विषयीच्या प्रेमाच्या भावना पुन्हा एकदा जाग्या होणार आहेत.

आणि तो थेट देशमुख कुटुंबीयांसमोर अरुंधती वरील प्रेमाची कबुली देणार आहे. आई कुठे काय करते ही मालिका गेली अनेक महिने टीआरपीमध्ये सतत नंबर एक वर होती. गेल्या काही आठवड्यांपासून मालिकेचा टीआरपी घसरला होता. ही मालिका दुसऱ्या स्थानावर किंवा तिसऱ्या स्थानावर आली होती.

तर याच वाहिनीवरील रंग माझा वेगळा ही मालिका पहिल्या क्रमांकावर होती. परंतु आता नव्या टीआरपी रिपोर्टनुसार रंग माझा वेगळा मालिकेत सोबत आई कुठे काय करते ही मालिका सुद्धा पहिल्या क्रमांकावर आली आहे. त्यामुळे येणारे काही दिवस आई कुठे काय करते ही मालिका अजूनही नंबर एक वर राहण्याची शक्यता अधिक आहे असे कळत आहे.

टीआरपी म्हणजे काय?

टीआरपी म्हणजे आपली मालिका एकूण लोक किती वेळेस पाहत आहेत. त्याचा टाइमिंग किती आहे. त्याचबरोबर आपल्या मालिकेवर येऊन लोक स्थिरावले आहेत का किंवा मालिका सुरू असताना प्रेक्षक दुसरीकडे गेला आहे का? त्या अनुषंगाने टीआरपी होत असतो. टीआरपी मोजणी पुन्हा एकदा सुरू झाली आहे. टीआरपी घोटाळा उघडकीस आल्यानंतर टीआरपी काही महिन्यांसाठी बंद करण्यात आली होती.

Team Hou De Viral