‘आई कुठे काय करते’ मध्ये येणार मोठा ट्विस्ट, संजना आणि कांचन वाढवणार अरुंधतीच्या अडचणी

‘आई कुठे काय करते’ मध्ये येणार मोठा ट्विस्ट, संजना आणि कांचन वाढवणार अरुंधतीच्या अडचणी

स्टार प्रवाह वर सुरू असलेल्या आई कुठे काय करते या मालिकेमध्ये आता वेगळे वळण येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. किंबहुना असे वळण येणारच आहे. आई कुठे काय करते या मालिकेचा प्रेक्षकवर्ग आता थोडा कमी झाल्याचे दिसत आहे.

कारण या मालिकेमध्ये एकामागून एक एकमेकांचे प्रेम प्रकरण दाखवण्यात येत आहेत. त्यामुळे या मालिकेवर अनेक जण नाराज देखील झालेले आहेत. मात्र असे असले तरी अनेक जण ही मालिका पाहताना दिसत आहेत. या मालिकेमध्ये सगळ्यांच्या भूमिका व्यवस्थित झालेल्या आहेत. मात्र आता दिग्दर्शकाने ही मालिका कुठेतरी थांबवावी, असे देखील अनेकजण म्हणताना दिसत आहेत.

आता मालिकेमध्ये वेगळेच वळण येणार आहे. ‘आई कुठे काय करते’ मालिकेमध्ये आता संजना आणि कांचन यांची युती झाल्याचे पाहायला मिळणार आहे. कारण की आप्पा यांनी अरुंधती हिला अर्धा घराचा हिस्सा दिलेला आहे. त्यामुळे संजना हिला आता हा हिस्सा अरुंधतीच्या वाट्यातून काढून घ्यायचा आहे.

याचे कारण म्हणजे अलिबाग येथे नुकतेच आशितोष आणि अरुंधती एक रात्र सोबत राहून आलेले आहेत. मात्र त्यानंतर देशमुख कुटुंबीयांमध्ये खूप मोठा गदारोळ झाल्याचा पाहायला मिळत आहे. अरुंधती हिच्या चारित्र्यावर अनिरुद्ध हा शंका घेतो. त्यामुळे कांचन देखील आता खूप भडकलेली आहे. अरुंधतीच्या चारित्र्यावर तीदेखील संशय घेते.

त्यामुळे वैतागून आप्पा हे अरूंधती हिला घर सोडून जाण्यास सांगत आहेत, तर दुसरीकडे संजना ही देखील आता अरुंधती हिला गेलेला हिस्सा वापस घ्यायचा कट रचत आहे. यासाठी ती आता कांचनची मदत घेणार आहे. आता कांचन आणि संजना यांचे देखील चांगलेच जमणार असल्याचे या मालिकेत दिसत आहे. त्यामुळे ही मालिका नेमकी कुठे जात आहे, असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे.

या मालिकेमध्ये अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने साकारली आहे. मधुराणी प्रभुलकर ही एक दर्जेदार अभिनेत्री आहे. यात शंकाच नाही. तिने याआधी देखील नवरा माझा नवसाचा या चित्रपटांमध्ये छोटी भूमिका साकारली होती. त्याच बरोबर इतर मालिकादेखील तिने केल्या होत्या.

अनिरुद्ध ची भूमिका मिलिंद गवळी या अभिनेत्याने साकारली आहे, तर इतर भूमिका देखील आपल्याला मालिकेत लोकप्रिय झाल्याचे दिसत आहे. संजनाची भूमिका रुपाली भोसले हिने साकारली आहे. गौरी, अनघा, अभिषेक यांच्या भूमिका ही प्रेक्षकांना खूप आवडतात. आता मालिकेमध्ये दुसरीकडे आशुतोष हा अरुंधती हिला आपल्या प्रेमाची कबुली देणार असल्याचे संकेत मिळत आहे.

त्यामुळे त्यांची प्रेमकहाणी देखील आता यापुढे सुरू होणार आहे. त्यामुळे अरुंधती आता पुढे आशुतोषला होकार देते का? हे पाहणे देखील आपल्याला पाहणे औसुक्याचे ठरेल. त्यामुळे ही मालिका नेमक्या कुठल्या ट्रॅकवर जात आहे, असा प्रश्न देखील चाहते उपस्थित करत आहेत.

Team Hou De Viral