अत्यंत वाईटरीत्या शेवट होणार ‘आई कुठे काय करते’ मालिकेचा

अत्यंत वाईटरीत्या शेवट होणार ‘आई कुठे काय करते’ मालिकेचा

स्टार प्रवाह सुरू असलेली आई कुठे काय करते मालिका ही वेगळ्या वळणावर आलेली आहे. आशुतोष आणि अरुंधती यांच्यामध्ये सध्या चांगलेच जमत आहे. हे पुढे जाऊन लग्न देखील करणार असल्याचे समजत आहे.

अरुंधतीची भूमिका या मालिकेमध्ये मधुराणी प्रभुलकर हिने साकारली आहे, तर अनिरुद्ध ही भूमिका मिलिंद गवळी यांनी साकारली आहे. या मालिकेमध्ये आपल्याला संजनाची भूमिका देखील दिसत आहे. संजनाची भूमिका रुपाली भोसले यांनी साकारली आहे, आता मालिकेत अरुंधती, आशुतोष यांच्यात चांगले जमत आहे.

मात्र, मालिका आता पुढे मोठे वळण घेणार आहे. या मालिकेचा शेवट कसा होणार आहे, हेच आम्ही आपल्याला या लेखातून सांगणार आहोत. आई कुठे काय करते मालिकेतील लवकरच अरुंधती, आशुतोष पत्रकार परिषद घेतील. पुढे हे दोघे एकत्र काम करायला लागतील. दोघांची मैत्री वाढेल. अरुंधती आशुतोष यांच्या नात्याचा शेवट मात्र इमोशनल वळणावर होणार आहे. काय घडणार आहे नेमकं आम्ही तुम्हाला सांगतो.

मालिकेत काही दिवसांनी अरुंधती आशुतोष यांचे लग्न होईल. लग्नाच्या काही महिन्यांनी आशुतोषला गंभीर आजाराला सामोरं जावं लागेल. तो आजारपणातून लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी अंरुधती मंदिरात प्रार्थना करेल. आशुतोष माञ अंथरुणाला खिळून असेल. त्याला श्‍वास घेताना त्रास होईल आणि नितीन काळजीत असेल.

सुलेखा मॅडम काळजीत असतील. अखेर आशुतोषचा श्वास बंद होतो. सर्वांना लांबून वाटतं तो झोपलाय. पण यशला जाणीव होईल. तो रडव्या आवाजात सगळ्यांना सांगेल. आशुतोष देवाघरी गेला असेल सर्वांना ही वाईट बातमी सांगेल. अरुंधतीचा या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. सगळे तिला सावरतील.

अरुंधती दुःखाचा डोंगर रस करेल. संजना, अनिरुध्द तिथे येतील. सर्वांना शॉक बसलेला असेल. अरुंधती आशुतोषवरील सर्व शेवटचा विधी पार पाडेल. आशुतोषने जाण्याआधी सर्व प्रॉपर्टी अरुंधतीच्या नावे केली असेल. अरुंधती वकिलांना बोलून ही सर्व प्रॉपर्टी सुलेखा ताईंच्या नावावर करेल.

याशिवाय आशुतोषने तिच्यासाठीची मोठी रक्कम मागे ठेवले असते. अरुंधती ही रक्कम कॅन्सर रुग्णांवर उपचार करणाऱ्या संस्थेला दान करेल. पुढे अरुंधती सर्व गोष्टींचा त्याग करून महिलाश्रमात काम करण्यासाठी वाहून देईल आणि तिथेच मालिकेचा शेवट होईल. आई कुठे काय करते ही मालिका बंगाली मालिकेवर आधारित आहे.

तर तुम्हाला आई कुठे मालिका आवडते का ? आम्हाला सांगा.

Team Hou De Viral