‘आई कुठे काय करते’ मालिकेतील शेखरच्या खऱ्या मुलीला पाहिलंत का

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील शेखरच्या खऱ्या मुलीला पाहिलंत का

सध्या स्टार प्रवाह या वाहिनीवर आई कुठे काय करते ही मालिका प्रचंड लोकप्रिय होताना दिसत आहेत. आता ही मालिका लवकरच संपणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. मालिकेमध्ये काम करणारे कलाकार देखील चांगल्या भूमिका साकारत आहेत.

या मालिकेमध्ये अरुंधती ची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने साकारली आहे, तर संजनाची भूमिका अभिनेत्री रूपाली भोसले हिने साकारली आहे. आता या मालिकेबद्दलचे काही प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. मालिकेत आशुतोष आणि अरुंधती यांचे लग्न होणार असल्याचे देखील दाखवण्यात येणार आहे.

मात्र, मालिकेच्या शेवटी आशुतोष हा गंभीर आजाराने मृत्युमुखी पडणार असे दाखवण्यात आले आहे. मृत्यू आधी तो त्याची सगळी संपत्ती अरुंधती हिच्या नावावर करून जातो. मात्र अरुंधती ही तिची पूर्ण संपत्ती पुन्हा सुलेखा ताई यांच्या नावावर करून टाकते. अरुंधती ही काही संपत्ती आश्रमाला दान करून टाकते.

या मालिकेमध्ये संजनाच्या पतीची भूमिका अभिनेता मयूर खांडगे यांनी साकारली आहे. मयूर याने या मालिकेमध्ये शेखर ही भूमिका अतिशय जबरदस्त रित्या साकारले आहे. आता मालिकेमध्ये त्याची पुन्हा एकदा एन्ट्री होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आहे.

शेखरची आता मालिकेतील एन्ट्री झाल्याने संजनाच्या पुढच्या अडचणी देखील आता मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे संकेत यातून मिळत आहेत. त्याचप्रमाणे तो अनिरुद्ध यालाही त्रास देईल असे दिसत आहे. अभिनेते मयूर खांडगे यांच्या बद्दल. मयूर यांचे लग्न झाले असून त्यांना मुलगी देखील आहे.

त्यांनी त्यांच्या मुलीचं नाव युगा असं ठेवलं आहे. तिला देखील अभिनयाची आवड असल्याचे दिसत आहे. मयूर यांनी युगाचा गंगुबाई काठीयावडी या सिनेमातील डायलॉग सोशल मीडियावर शेअर केला आहे. मयूर खांडगे यांनी मराठी नाटक सिनेमा आणि मालिकांमध्ये अभिनय केलाय.

हरिश्चंद्राची फॅक्टरी, माऊली, देऊळ, सायकल या सिनेमात त्यांनी काम केले असून गंध फुलांचा गेला सांगून, बाळूमामाच्या नावानं चांगभलं, आई कुठे काय करते आणि संत गजानन शेगावीचे या मालिकादेखील त्यांनी काम केले आहे. याशिवाय त्यांनी काही मराठी नाटकात देखील काम केलेल आहे.

तर तुम्हाला आई कुठे काय करते मालिका आवडते का? आणि मालिकेतील शेखर म्हणजे मयूर तुम्हाला आवडतात का ? आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा.

Team Hou De Viral