अरे बापरे ! एकाचवेळी ‘आई कुठे काय करते’ मधील दोन अभिनेत्री घेणार मालिकेतून ब्रेक?

अरे बापरे ! एकाचवेळी ‘आई कुठे काय करते’ मधील दोन अभिनेत्री घेणार मालिकेतून ब्रेक?

सध्या सर्वत्र चर्चेत असलेले मालिका म्हणजे आई कुठे काय करते. या मालिकेत सध्या अरुंधती व आशुतोष यांची मैत्री फुलताना दिसून येत आहे. येणाऱ्या काही भागांमध्ये आपण पाहणार आहोत की, आशुतोष अरुंधती एक पत्रकार परिषद घेणार आहेत आणि यानंतर आपल्या गाण्याचा अल्बम रिलीज करणार आहेत.

अरुंधती व आशुतोष या एका अल्बम नंतर एकत्र काम करताना दिसणार आहे. एकत्रित काम करत असताना त्यांची मैत्री फुलणार आहे. यास देशमुख कुटुंबातील काही सदस्य सुरुवातीपासूनच विरोध करताना आपणास दिसत आहेत. परंतु आप्पा मात्र या दोघांच्या मैत्रीला तसेच येणाऱ्या नवीन नात्याला देखील नाव देणार असल्याचे सर्वत्र चर्चिले जात आहे.

अर्थातच अरूंधती व आशुतोषचा विवाह आप्पा करून देणार आहेत. या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारत असलेली मधुराणी प्रभुलकर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपली छाप निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे, तर संजना म्हणजेच रुपाली भोसले हिनेही‌‌ मालिकेत चांगलं काम‌ केले आहे.

आई कुठे काय करते ही मालिका वेगळ्या टप्प्यावर येऊन पोहोचलेली आहे. ही मालिका आता लवकरच संपणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या मालिकेला प्रेक्षक हे कंटाळले असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अनेक जण आता याबाबत खुलेआमपणे बोलताना दिसत आहेत.

या मालिकेमध्ये रुपाली भोसले हिने देखील अतिशय जबरदस्त असे काम केले आहे. तिने साकारलेली संजनाची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली आहे, तर मिलिंद गवळी यांनी देखील अनिरुद्धची भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने साकारली आहे. मालिकेतील इतर भूमिकाही प्रेक्षणीय झालेल्या आहेत.

कांचन, आप्पा, विमल, यश, गौरी, ईशा यांच्या भूमिकाही लोकप्रिय ठरलेल्या आहेत, तर आता या मालिकेतून मुख्य भूमिकेत असलेली अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकर गोखले आणि संजना च्या भूमिकेत असलेले रुपाली भोसले या दोघीही मालिकेतून ब्रेक घेणार असल्याची चर्चा सध्या रंगत आहे.

याचे कारण म्हणजे आगामी एका नाटकांमध्ये दोघेही एकत्र दिसणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आता दोघीही या नाटकात दिसल्यास नवल वाटायला नको. आता दोघूही मालिका सोडतात की मालिकेमध्ये काम करून नाटकातही काम करतात ते आपल्याला लवकरच कळेल.

Team Hou De Viral