अनिरुद्धने काढली अरुंधतीची लायकी, ‘आई कुठे काय करते’ मालिकेत धक्कादायक वळण

अनिरुद्धने काढली अरुंधतीची लायकी, ‘आई कुठे काय करते’ मालिकेत धक्कादायक वळण

आई कुठे काय करते या मालिकेत अरूंधती व आशुतोष एक पत्रकार परिषद घेतात. पत्रकार परिषद त्यांच्या गाण्याचा अल्बम विषयी सविस्तर माहिती देण्यासाठी असते. या पत्रकार परिषदेत संजना नेहमीप्रमाणेच अरुंधतीच्या विरोधात एक कारस्थान करते.

अरुंधतीसोबत पुन्हा एकदा पंगा घेते. अरुंधती उपजत असलेल्या कला गुणांच्या आणि कौशल्याच्या जोरावर आपल्या पायावर यशस्वी उभी राहिली आहे. संजना आणि अनिरुद्ध तिच्या वाटेत सतत अडचणी निर्माण करत आहे. तसेच तिला देशमुख कुटुंबीयांच्या नजरेत वाईट व चारित्रहिन सिद्ध करण्यासाठी अनिरुद्ध आणि संजना नेहमीच प्रयत्न करत आहेत.

यात काही प्रमाणात अनिरुद्ध यशस्वी देखील झाला आहे.अनिरुद्धची आई अरुंधतीच्या चारित्र्यावर संशय घेते. अरुंधती आपल्या आईप्रमाणे सासुला म्हणजेच कांचनला मानत असते. परंतु अरुंधतीवर त्या चारित्र्यावरुन संशय घेतात. त्यामुळे अरुंधती देशमुख कुटुंबीयांचे घर कायमस्वरूपी सोडते.

पुन्हा त्या घरात पाऊल देखील ठेवत नाही. त्यामुळे अनिरुद्ध व संजना अरुंधतीला कायमस्वरूपी देशमुख कुटुंबीयातुन बाहेर काढण्यात यशस्वी झाले आहेत. आता नुकताच एक अरुंधती आणि अशुतोषच्या गाण्याच्या अल्बमविषयी पत्रकार परिषद पार पडली आहे. परंतु या कार्यक्रमात संजना आणि अनिरुद्धने अनेक प्रयत्न करून अरुंधतीला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

संजना एका पत्रकाराला लाच देते आणि ती सांगते. त्याप्रमाणे तो पत्रकार अरुंधतीला प्रश्न विचारतो. या प्रश्नाचे उत्तर अरुंधती स्पष्टपणाने देणार असं सांगते. उत्तर देखील देते. संजनाने केलेल्या या कारस्थानात ती यशस्वी होऊ शकत नाही.

नुकताच एक नवीन प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये संजना अरुंधतीला म्हणते की, तू आशुतोष केळकरच्या जीवावर इतकी काही करत आहेस, तुझ्या पंखात इतकं बळ नव्हतं. यावर अरुंधती म्हणते, मला कोणाच्या आधाराची गरज नाही तुला आहे. त्यानंतर अनिरुद्ध संजनाला तेथून घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो.

त्यावेळी तो म्हणतो तू अरुंधतीच्या हाताखाली काम करावं, इतकी तिची लायकी नाही. यानंतर येणाऱ्या काही भागांमध्ये आपण पाहणार आहोत की, संजनाने त्या पत्रकाराला पैसे दिले आहेत हे अविनाश आणि यश सर्वांसमोर उघड करतात. परंतु संजना या गोष्टीस नकार देते. त्यावेळी तो पत्रकार म्हणतो की, मॅडम खोटं बोलू नका माझ्याकडे तुमचे कॉल रेकॉर्ड आहेत.

त्यावर संजना आणि अनिरुद्ध खूप घाबरतो. यावर आशुतोष सर्वांसमोर म्हणतो की, संजनाला काय शिक्षा द्यायची हे ठरवण्याचा अधिकार फक्त अरुंधतीला आहे. त्यावर अरुंधती संजनाला खडे बोल सुनावते व आशुतोषच्या कंपनीत तू काम करणार नाहीस,असे सांगते.

Team Hou De Viral