‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकार एका एपिसोडसाठी घेतात ‘चिक्कार’ मानधन, अरुंधतीचे मानधन ऐकून थक्क व्हाल

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकार एका एपिसोडसाठी घेतात ‘चिक्कार’ मानधन, अरुंधतीचे मानधन ऐकून थक्क व्हाल

“आई कुठे काय करते” ही मालिका आता चांगलीच रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. जबरदस्तीने का होईना, संजना अनिरुद्धला आपल्या सोबत लग्न करायला लावते. परंतु अनिरुद्धाचे मन अजूनही अरुंधतीची जागा संजनास देण्यास तयार नसते. तरीही अरुंधतीच्या शब्दाखातर तो लग्न करतो. यानंतर अरुंधतीला एक छान नौकरी मिळाल्याचे अनघा अरुंधतीच्या घरच्यांना सांगते.

सर्वजण खुश होतात आणि रात्री सेलिब्रेशन ठरवतात. हे सेलिब्रेशन गौरीच्या घरी होणार असते. या सेलिब्रेशनला अनिरुद्ध संजनाला न सांगता जातो. यावर संजनाचा संताप अनावर होतो. घटस्फोट झाल्यावरही अनिरुद्ध आणि अरुंधती यामधील दुरावा कमी होत आहे, असे तिला वाटते. आजही या दोघांचे विचार एक आहेत, असा संजना विचार करते. यानंतर ती ठोस निर्णय घेणार असल्याचे मनात निश्चित करते.

या मालिकेत सर्वच पात्र अगदी आपापल्या परीने उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. त्यामुळे या मालिकेला उत्तरोत्तर रंग चढत जात आहे.चला तर मग जाणून घेऊया “आई कुठे काय करते” मालिकेतील कलाकारांची खरी नावे, त्यांचे वय आणि त्यांचे प्रत्येक एका भागाचे मानधन किती आहे ते?

1) अरुंधती – या मालिकेमध्ये अरुंधतीने अतिशय उत्कृष्टपणे अभिनय केला आहे. तिच्या अभिनयाची नेहमीच तारीफ केली जाते.अरुंधतीचे खरे नाव मधुराणी प्रभुलकर असे आहे. मधुराणीचे वय ३८ वर्षे असून ती या मालिकेत प्रत्येक भागासाठी २५ हजार इतके मानधन घेते.

2) अनिरुद्ध – अनिरुद्ध या मालिकेत खूप छान अभिनय करत आहे. आई-वडिलांची काळजी घेणे तसेच परिवारासाठी मेहनत करणारा अनिरुद्ध आहे. याचे खरे नाव मिलिंद गवळी असे आहे. मिलिंदचे वय पण ५४ वर्ष आहे. मिलिंद गवळी या मालिकेतील प्रत्येक भागासाठी २० हजार इतके मानधन घेतो.

3) संजना – संजनाने मालिकेत खूप छान काम केले आहे. संजनाबद्दल नेहमीच चर्चा केली जाते. संजना हट्टी दाखवली आहे. संजनाचे खरे नाव रूपाली भोसले असे आहे. तिचे वय ३७ वर्षे असून ती या मालिकेसाठी १७ हजार प्रत्येकी भागांसाठी मानधन घेते.

4) आप्पा – या मालिकेत आप्पा नेहमीच अरुंधतीच्या पाठीशी असतात. अरुंधतीला आपली मुलगी मानत असतात. तिच्या मनातले सर्व काही जाणणारे असे हे वडील आहेत. आप्पा यांचे खरे नाव किशोर महाबोले असून त्यांचे वय ६२ वर्षे आहे. या मालिकेतील प्रत्येक भागासाठी ते ११ हजार इतके मानधन घेतात.

5) अनघा – या मालिकेत नेहमीच अरुंधतीच्या सोबत खंबीरपणे असणारी आहे. अरुंधतीला ताई मानत असते. या नात्याने अरुंधतीसाठी जमेल तसं ती मदतीला धावून येत असते. अनघाचे खरे नाव अश्विनी महागडे आहे. तिचे वय ३० वर्ष असून ती या मालिकेतील प्रत्येक भागासाठी १० हजार मानधन घेते.

6) यश – यश या मालिकेत सगळ्यात लहान मुलगा आहे. ज्यावेळी अरूंधती संकटात असते त्या – त्या वेळी यश हा तिला मदत करतो. अडचणीच्या काळात अरुंधती यशच्या मदतीने , सल्ल्यानेच पुढे चालत असते. यशचे खरे नाव अभिषेक देशमुख असून त्याचे वय २७ वर्षे आहे. हा अभिषेक हा या मालिकेसाठी १४ हजार प्रत्येक भागासाठी मानधन घेतो.

7) अभिषेक – अभिषेक एक खूप छान समजदार संयमी सर्वांच्या मनाचा विचार करून वागणारा अरुंधतीचा मोठा मुलगा असतो. अभिषेकचे खरे नाव निरंजन कुलकर्णी असे आहे. निरंजन चे वय ३२ वर्षे असून तो या मालिकेतील प्रत्येक भागासाठी ११ हजार इतके मानधन घेतो.

Team Hou De Viral