पैशांसाठी आलिया भट्ट आपले वडिल महेश भट्टसोबत करायची ‘हे’ काम, बाप-लेकीचं असं नातं जे विचार करायला पाडतंय भाग..!

पैशांसाठी आलिया भट्ट आपले वडिल महेश भट्टसोबत करायची ‘हे’ काम, बाप-लेकीचं असं नातं जे विचार करायला पाडतंय भाग..!

आलिया भट बॉलीवुडची सगळ्यात चुलबुली अभिनेत्री आहे. आलिया भट्ट आणि जोक याचे समीकरण काही वर्षांपूर्वी होते. मात्र, आता हे समीकरण संपुष्टात आल्याचे दिसत आहे. कारण आलिया भट्ट आता चांगल्या पद्धतीचा अभिनय आपल्या चित्रपटात करताना दिसत आहे.

आलिया भट्ट हिचा जोरदार अभिनय असलेला गंगुबाई काठीयावाडी हा चित्रपट नुकताच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. संजय लीला भन्साळी यांचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट चर्चेत आलेला आहे. या चित्रपटात अजय देवगण याची देखील प्रमुख भूमिका आहे.

संजय लीला भन्साळी यांना दर्जेदार चित्रपट बनविण्याचा मोठा हातखंडा आहे. गंगुबाई काठीयावाडी या चित्रपटामध्ये वेश्यांच्या जीवनावर आधारीत चित्रण करण्यात आले आहे. गंगुबाई काठीयावाडी ही वेश्या आपल्या सहकारी महिलांसाठी न्याय देण्याच्या भूमिकेत असते. त्याचप्रमाणे ती वेगवेगळे उपक्रम देखील वेश्यांसाठी राबवते.

याचे चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहेत. आलिया भट्टने या चित्रपटात जोरदार काम केले आहे. आलिया भट्ट गेल्या काही दिवसांपासून खूपच चर्चेत आलेली आहे. आलिया भट्टने तिचे वडील महेश भट्ट यांच्या बाबतल केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. याबद्दलच आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

आलिया भट्टने स्टुडन्ट ऑफ द इयर या चित्रपटामध्ये पदार्पण केलेल्या चित्रपटाची निर्मिती करण जोहर याने केली होती. या चित्रपटाला जोरदार यश मिळाले. वरूण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या या चित्रपटात भूमिका होत्या. त्या वेळेस वरूण धवन यांच्या सोबत आलियाचे प्रेम प्रकरण सुरू असल्याची चर्चा होती. मात्र, सध्या आलिया ही रणबीर कपूर यांच्या सोबतच राहत आहे.

कटरीना कैफ हिला सोडचिठ्ठी दिल्यानंतर रणबीर कपूर आता आलिया भट्टसोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत आहे. हे दोघे लवकरच लग्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आलिया भट्ट यांच्या नात्यात बाबत चर्चा मोठ्या प्रमाणात असतात. आता आलिया भट्ट आणि तिचे वडील त्याबद्दलची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

महेश भट्ट हे चोखंदळ निर्माते व दिग्दर्शक आहेत. महेश भट्ट यांनी आपली मुलगी पूजा भटच्या सोबतच काही वर्षापूर्वी चुंबन दृश्य देऊन धुमाकूळ घातला होता. त्यांचा हा फोटो एका मॅगझिनमध्येही छापला होता. त्यामुळे आपल्या मुलीचं चुंबन घेतो, हा कसला बाप अशा कमेंट त्यावेळेस आल्या होत्या. आता आलिया भट्ट हिच्याबद्दलही एक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.

सोनी राजदान यांच्यापासून महेश भट यांना आलिया ही मुलगी आहे. आलिया ही अतिशय चुलबुली अशी आहे. आलिया हिला आपल्या वडिलांचा सल्ला हा महत्त्वाचा वाटतो. महेश भट्ट यांची आलिया ही खूपच लाडकी लेक आहे. अतिशय लाडामध्ये तिला वाढवले आहे. नुकतीच महेश भट यांनी एक मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्यांनी आलियाच्या बाबतीत अनेक खुलासे केला.

आलिया भट ही अतिशय दर्जेदार अशी मुलगी आहे. आज ती कोट्यावधी रुपये कमवत आहे. पन्नास वर्षात मला जे जमले नाही ते मुलगी आलिया हिने करून दाखवले. असे त्यांनी सांगितले, तर आलिया ही लहान असताना माझ्या पायाला ती क्रीम लावायची. त्यावेळेस मी तिला पाचशे रुपये देत होतो, असे महेश भट्ट यांनी सांगितले आहे.

मात्र आता ती कोट्यावधी रुपये कमवत आहे, असेही ते म्हणाले. मला तिचा अभिमान आहे. आलिया आपल्या वडिलांबद्दल म्हणाली की, माझ्या वडिलांसारखे या जगात दुसरे कोणीच नाही. ते अतिशय जबरदस्त दिग्दर्शक आहेत. मात्र त्यांच्या नावाचा फायदा मी कधीच करून घेतला नाही. माझ्या अभिनयाच्या जोरावर मी चित्रपट मिळवले, असे तिने सांगितले.

Team Hou De Viral