संडे हो या मंडे रोज खाओ अंडे…अंडे खाण्याचे फायदे जाणून व्हाल चकित…

आपण काही वर्षापूर्वी टेलिव्हिजनवर एक जाहिरात आवर्जून पाहिली असेल. या जाहिरातीमध्ये एक जण सांगतो की, संडे हो या मंडे रोज खाओ अंडे. ही जाहिरात ऐकताना शाकाहारी लोकांना किळसवाणी वाटले असेल. मात्र, लोकांचे आयुष्यमान वाढविण्यासाठी सरकारकडून ही जाहिरात पुरस्कृत करण्यात आली होती आणि त्याचे वैशिष्ट्य कशी आहे ते अनेक आजारांवर रामबाण उपाय ठरू शकते.
मात्र, शाकाहारी लोकांना अंडे खाणे म्हणजे हे पाप असल्यासारखे वाटते. अनेक लोक तसे समज तात. आमचा धर्मभ्रष्ट झाला असे लोक म्हणत असतात. अंडे शाकाहारी की मांसाहारी याबाबत मतमतांतरे अनेक वर्षापासून आहेत. मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे अंडी खाणे हे अतिशय उपयुक्त मानले जाते आणि डॉक्टर याबाबत सल्ले देत असतात.
गर्भवती महिलांनी तर अंड्याचा अवश्य वापर करावा. त्यामुळे गर्भात वाढणाऱ्या बाळाचा विकास चांगल्याप्रकारे होतो, असे डॉक्टर सांगतात.आम्ही आपल्याला या लेखामध्ये अंडी खाण्याचे विविध होणारे फायदे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ कोणते फायदे आहेत ते…
1) अंड्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात. त्यामुळे माणसाचा विकास चांगल्या प्रकारे होऊ शकतो. अंड्यामध्ये कार्बोहायड्रेट, विटामिन बी 6, बी 12 गुणधर्म असतात. त्यामुळे अंडीचे सेवन नियमित करावे. यामुळे आपल्या शरीराला चांगली प्रकारची ऊर्जा मिळवून आपली प्रकृतीही चांगली राहते आणि डॉक्टर देखील अंडे खाण्याचा सल्ला देत असतात.
2) ज्या लोकांचे हाडेही कमजोर आहेत त्यांना डॉक्टर आवर्जून अंडी खाण्याचा सल्ला देतात. अंडे खाल्ल्यामुळे हाडेही मजबूत होतात. अंड्यामधील पिवळ्या बालकांमध्ये व्हिटॅमिन डी खूप मोठ्या प्रमाणात भरलेले असते. त्यामुळे अंडे खाल्याने हाडे मजबूत होतात. तसेच शरीराच्या इतर पेशींमध्ये देखील चांगल्या प्रकारची वाढ होऊन आपले अवयव चांगल्या प्रकारे काम करतात. त्यामुळे अंड्याचे सेवन हे केले पाहिजे.
3) ज्या लोकांना डोळ्यांची समस्या आहे. डोळे येणे, डोळ्यातून पाणी येणे आणि विविध डोळ्यांचे आजार आहेत त्यांनी अंड्याचे नियमितपणे सेवन करावे. अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये विटामिन डी असते. तसेच अंड्यामध्ये लुटीन हा घटक असतो. त्यामुळे त्याचे सेवन केल्याने डोळ्यांचे आरोग्य हे चांगल्या प्रकारे राहते. तसेच विनातक्रार आपल्याला काम देखील करता येते.
4) ज्या लोकांची त्वचा ही अतिशय रुक्ष आहे अशा लोकांनी नियमितपणे अंड्याचे सेवन करावे. यामुळे त्वचा ही त जेल आणि उठावदारपणा दिसते. आपले व्यक्तिमत्त्व अतिशय खुलून दिसते. त्यामुळे अंडीचे सेवन नियमित प्रमाणे केल्याने आपले त्वचेवर त्याचा चांगला परिणाम पाहायला मिळतो.
5) ज्या लोकांना उच्च रक्तदाब( बीपी) आणि इतर आजार आहेत अशांनी अंड्यामधील पिवळा भाग खाऊ नये. पिवळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण असते. त्यामुळे इतर आजार हे वाढू शकतात. त्यामुळे पिवळा भाग काढून अंडीचे सेवन करावे. जेणेकरून ह्रदयरोग असणाऱ्या लोकांना याचा त्रास होणार नाही.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.