‘सैराट’ चित्रपटातील आर्चीची आई खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर!

‘सैराट’ चित्रपटातील आर्चीची आई खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर!

सैराट या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीला नवे आयाम दिले. या चित्रपटाने अनेक विक्रम नोंदवले होते. मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांचा हा चित्रपट होता.

मराठी मध्ये पहिल्यांदाच शंभर कोटी रुपयांचा व्यवसाय करणारा हा चित्रपट ठरला. याआधी असा विक्रम कुठल्या चित्रपटाला करता आला नाही. दुनियादारी हा चित्रपट देखील विक्रम करणारा ठरला होता. मात्र, सैराटने सगळे विक्रम मोडले. सैराट चित्रपटासाठी नागराज मंजुळे यांनी विशेष मेहनत घेतली होती.

या चित्रपटासाठी त्यांना ग्रामीण बाज असलेले कलाकार हवे होते आणि त्यांनी तशी निवड देखील केली होती. सैराट चित्रपटामध्ये आपल्याला आर्ची आणि परश्या यांची जोडी दिसली. त्यांची जोडी अवघ्या महाराष्ट्राला आवडली होती. आर्चीची भूमिका या चित्रपटांमध्ये रिंकू राजगुरु हिने साकारली होती, असे असले तरी तिला अर्ची या नावाने ओळखले जायचे, तर आकाश ठोसर याने या चित्रपटामध्ये परशाची भूमिका साकारली होती.

रिंकूला एवढी लोकप्रियता या चित्रपटातून मिळाली की, तिला बाहेर जाताना आपल्या भोवती बॉडीगार्ड ठेवावे लागायचे. या चित्रपटानंतर रिंकू राजगुरु हिने काही अल्बम आणि चित्रपटात देखील काम मिळेल केले. मात्र, तिला अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाले. ज्यावेळेस हा चित्रपट आला होता, त्यावेळेस रिंकू राजगुरु ची दहावी देखील झाली नव्हती. असे असले तरी ती लोकप्रियतेच्या शिखरावर गेली.

या चित्रपटातील सगळ्याच भूमिका या लोकप्रिय ठरल्या होत्या. सल्या, लंगडा यांच्यासह इतर भूमिकाही प्रेक्षकांना खूप आवडल्या होत्या. खुद्द नागराज मंजुळे यांनी या चित्रपटात एक छोटी भूमिका साकारली होती. त्यांनी क्रिकेटच्या मैदानावर कॉमेंटेटरची भूमिका केली होती. त्यांची बोलण्याची स्टाइल सगळ्यांना आवडली होती.

नागराज मंजुळे यांनी याआधी पिस्तुल्या हा लघुपट केला होता. हा लघुपट गाजला होता. त्यानंतर फॅन्ड्री चित्रपटातूनही त्यांनी आपल्यातला अभिनय आणि दिग्दर्शन कौशल्य दाखवून दिले. आता नागराज मंजुळे यांचा हिंदीतही दबदबा निर्माण झाला आहे. कारण की त्यांचा झुंड हा चित्रपट लवकरच बॉक्स ऑफिसवर येणार आहे.

हिंदी चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी विजय ही भूमिका साकारली आहे. ते एका फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसले आहेत. तर झोपडपट्टीतील मुलांना ते फुटबॉल शिकवतात अशी या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धम्माल करणार यात कोणालाही शंका नाही.

नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपटामधील आर्ची आईच्या भूमिकेमध्ये एक अभिनेत्री दिसली होती. तिची आता नुकतीच सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. कारण तिने सोशल मीडियावर आपले हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या अभिनेत्रीचे नाव भक्ती चव्हाण असे आहे. भक्ती चव्हाण या सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांनी नुकतेच टाकलेले फोटो चाहत्यांसाठी पर्वणी ठरले आहेत.

अनेकांना भक्ती चव्हाण यांना ओळखता आले नाही. मात्र, एका चाहत्याने त्यांना ओळखले आणि सैराट चित्रपटातील ही आर्चीची आई आहे असे सांगितले. त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटातही काम केले आहे. भक्ती चव्हाण यांनी याआधी एक मराठा लाख मराठा, तुला पण बाशिंग बांधायचं, कॉपी, वंटास, तू माझा सांगती, घेतला वसा टाकू नको यासारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

Team Hou De Viral